सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर:_जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, यु. के. रांगणकर, आर. के. वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी स्वंयशासन, माहितीचा अधिकार, गणित उपक्रम, चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा बाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वानखेडे सर यांच्या जन्मदिनानिमित्त व पूजा गेडाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त गणवेश वाटप करण्यात आलेत.
शाळेच्या विद्यार्थिनी कु. अनुष्का दुर्गे व कु. त्रिशाली महानंद यांनी ” मुलींचे शिक्षण खुले ग!” हे गीत गायन केले.
तसेच कु. त्रिशाली महानंद व कु. अनुष्का दुर्गे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आपल्या भाषणातून माहिती दिली.
प्रास्ताविक माहिती देतांना आर. बी. अलाम सर यांनी सांगितले की, त्याकाळी शिक्षणाची मुभा नव्हती आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणामुळे विचार क्षमता निर्माण होते याकरीता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून मुलींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला.
एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, शिक्षण क्षेत्रात स्त्रियांची महत्त्वाची भूमिका आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याई मधून हे सर्व प्राप्त झाले आहे.
यु. के. रांगणकर यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लक्षात आले होते की, समाजाला प्रगत करायचे आहे, तर घरापासून सुरुवात करायला हवी. म्हणून त्या स्वतः शिक्षित झाल्या आणि त्यांच्याच मुळे मुलींची प्रगती झाली, त्यांच्या कार्याची जाण ठेवायला हवी.
अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चंदावार बाबू, जगदीश कांबळे, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले सहित विद्यार्थी गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. अलाम, संचालन एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना नाश्ता वाटप करण्यात आला.