अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लोकजनशक्ती पार्टी वर्धा जिला शाखा हिंगणघाट द्वारे मोरेश्वर पिंपलशेंडे वर्धा जिला उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जोगेंद्र जयराज यांची लोकजनशक्ती पार्टी हिंगणघाट शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
पक्षाच्या जन कल्याणकारी कार्यास त्यांचे योगदान महत्वाचे राहणार आहे. आणि त्यांना या नियुक्ती बद्दल शुभेछा देण्यात आल्या. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे जिलाध्यक्ष केशव तीतरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.