अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील गल्लीबोळात, रिकाम्या जागेचा आडोसा घेऊन रात्री थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब, बेघर, गरजुंना 30 उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम मित्र परिवार तर्फे दिलदार व मदतीसाठी सदा तत्पर असणारे सुनील रिठे यांच्या कल्पनेतून शहरात फिरून राबवला.
शहरात अनेक बेघर, निराधार दिवसभर पोटासाठी भटकंती करतात. आणि रात्री निवाऱ्यासाठी मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानकाचा आश्रय घेतात. रोजी रोटीसाठी घर सोडलेले, डोक्यावर हक्काचे छप्पर नसणारे आणि थंडीत कुडकुडणाऱ्या माणसांसाठी काहीतरी करायचे , या भावनेतून सुनील रिठे यांनी हा उपक्रम नवीन वर्षाचे औचित्य साधून शहरात राबविला. यावेळी शहरातील रस्त्याच्या ठिकाणी, फूटपाथवर झोपेत कुडकुडणाऱ्या गरिब, गरजूंना ब्लँकेट दिले. यावेळी पियुष मस्के, उमाकांत रिठे, निलेश सावंकार, विकास भुते, सतीश गौळकार इत्यादी उपस्थित होते.
रस्त्यांवर, दुकानांच्या आडोशाला कुडकडकुणाऱ्या नागरिकांना मदत करावी यासाठी दानशूर सुनील रिठे यांनी ब्लँकेट वाटपाचा निर्णय घेतला. थंडी पासून बचावासाठी अनपेक्षितपणे मिळालेल्या उबदार ब्लँकेटमुळे गोरगरीब,गरजुंच्या चेहऱ्यावर आशीर्वाद रुपी समाधानाचे भाव होते.

