अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारीशक्ती वस्ती स्तर संघ, नन्नाशा व खंडोबा वार्ड, हिंगणघाट यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा विशेष सक्रिय सहभाग दिसून आला, ज्यामुळे उत्सवाला आणखी प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण परिमाण प्राप्त झाले.
या विशेष कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याची आणि समाजसेवेची आठवण करून दिली गेली. उपस्थितांनी त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तन आणि महिला सक्षमीकरणाची वचने दिली. सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पुढे नेण्यासाठी समाजातील प्रत्येक थरातून सक्रिय सहभाग दिसून आला. कार्यक्रमाने प्रेरणा आणि नवचैतन्याचा संदेश दिला.
टिळक चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी:

स्थानीय टिळक चौक येथील श्री साई मंदिर मधे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संतोष तिमांडे तर प्रमुख उपस्थिती हेमराज हरने, पुष्पा चौहान, भाग्यश्री कुबडे, रविंद्र भगत यांची होती.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रमुख वक्तानी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संतोष तिमांडे यांनी महिलाच्या उत्थानासाठी प्रसंगी सोसलेल्या कष्टाचे वर्णन करून त्यांच्या मुळेच आज महिला राष्टपती पासून तर समाजातील प्रत्येकस्तरा पर्यंत पदे भूषवित असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन केशव तीतरे यांनी तर आभार जयंत मानकर यांनी मानले. यावेळी शंकुतला काटवले, दीक्षा कुबडे, प्रतिमा ठाकरे, सुरेखा धात्रक, जोगेंद्र जयराज, गुरुसिंग जयराज, मुकेश परिहार, रामेश्वर इंगोले, अनिल कडू, प्रगत तितरे सहित अनेकांची उपस्थिती होती.