युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथील लुंबिनी बुद्ध विहारात. दिनांक 3 जानेवारी ला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका कळमेश्वर तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश श्रीखंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गायक अरुण सहारे युवराज मेश्राम, गौतम जांभुळकर, इंद्रकुमार तागडे, लक्षमणदादा गायकवाड हे होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर अतिथींनी विचार प्रभावीपणे मांडले. यात गौतम जांभुळकर आपल्या वक्तव्यात म्हणाले कि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा काढली नसती तर भारतात एकही महिला सन्मानाने जगली नसती. गायक अरुण सहारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर सुंदर गीत सादर केले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव अरूण वाहणे यांनी उत्कृष्ट रित्या सुत्रसंचलन केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिपक मेश्राम यांनी मानले. सौ.कल्पना मेश्राम, सौ.रूपाली मेश्राम, दशरथ मेश्राम, राहुल मेश्राम, प्रदिप पटेल यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.

