रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपिस्थतांची मने जिकंली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नायब तहसीलदार बाजीराव काळुके तर प्रमुख अतिथी म्हणून गट समन्वयक कल्याण बागल, आर्ट ऑफ लिविंगचे जगन्नाथ वायाळ, डॉ. बरकुले, ॲड. राहुल लिंबुळकर, साकळकर, अनिस अन्सारी, डॉ. रवी गायकवाड संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके, सचिव मीनाक्षी काळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. स्वागत गीत मीना मसलेकर, अश्विनी यंदे, दुर्गा भोसले यांनी गायले. शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर यांनी शाळेच्या प्रगती विषयी अहवाल वाचन केले. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात भक्तीगीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, शेतकरी नृत्य, कथ्थक, लोकनृत्य सादर केले.