प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वरोरा:- तालुक्यातील जळका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीपणे पार पडले. अभिजीत कुडे मित्र परिवार HelpAge India GMR warora यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून जळका येथील जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून जेष्ठ नागरिकांची सेवा करायला मिळणे म्हणजे भाग्य असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहे. उखर्डा, नागरी, वाघनख, खरवड, जळका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. तसेच दिनांक 6 जानेवारी 2025 रोज सोमवारी माढेळी येथील शेतकरी भवन येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
नागरी माढेळी भागातील सर्वच गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दादाभाऊ उरकुडे, श्रीराम फुलझेले, रोशन भोयर यांनी परिश्रम घेतले. HelpAge India रशेदा शेख सीनियर एक्झिक्युटीव्ह, संदीप नरवडे, वैभव देठे, संदीप काळे यांची वैद्यकीय टीम उपस्थित होती. या शिबिराच्या माध्यमातून 137 नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.