नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. राजू पोद्दार यांचा भव्य नागरी सत्कार, सत्कारासाठी उसळली गर्दी.
युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर:- आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रेमाने जिव्हाळ्याने निवडून दिल त्यामुळे तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व सावनेर कळमेश्वर. विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून संपूर्ण महाराष्ट्रात नंबर एकचे विधानसभा क्षेत्र बनविणार अशी स्पष्ट ग्वाही सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी कळमेश्वर बाजार चौकात आयोजित भव्य नागरी सत्कार व आभार सभेत विचार व्यक्त करताना दिली.
भारतीय जनता पार्टी कळमेश्वर ब्राह्मणी शहराच्या वतीने दिनांक 7 जानेवारीला साय 7.00 वाजता सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार व मतदाराचे आभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार होते प्रमुख पाहुणे आयुषी देशमुख, मनोहर कुंभारे, एड. प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे, संदीप उपाध्याय, शहराध्यक्ष धनराज देवके, मीना तायवाडे, प्रकाश वरुळकर, महादेव इखार, सविता नाथे, प्रगती मंडल, मनोज शेंडे, वर्षा कामडी, सुनिता मंडलिक, एड .जयश्री पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख पुढे म्हणाले की कळमेश्वर हे आर्थिक चलनवाढीचे केंद्र व्हावे यासाठी कळमेश्वर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योगासाठी प्रयत्न करणार. गोंडखैरी मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिज शहरांमधील रस्ते, खताचा कारखाना शेतकरी हितासाठी संत्रा मोसंबी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे, पांदण रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून चांगल्या दर्जा चे रस्ते तयार करण्यासाठी आग्रही राहील, गोंड खैरी येथे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क, कळमेश्वर शहर सॅटेलाईट सिटी निर्माण करण्याचे दिशेने प्रयत्न करणे, महिलांना रोजगार मिळावा यासाठी गारमेंट झोन तयार करणे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशीर्वादाने केंद्र व राज्य शासनाच्या योजना तुमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी व तुमचा एक लोकसेवक म्हणून तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील असेही म्हणाले.
या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय मार्गदर्शनातून डॉ. राजीव पोतदार म्हणाले की आपल्या आशीर्वादाने भूतो न भविष्य असा अभूतपूर्व विजय प्राप्त झाला असून आता आशिष पर्व सुरू झाले आहे. पुढील काळात शहरातील रस्ते रेल्वे ओव्हर ब्रिज व विकासात्मक कामाला प्राधान्य देण्यात येईल धापेवाडा रोडवरील मानकर शाळेपासून तर ब्राह्मणी फाटा विश्रामगृह ते एमआयडीसी पर्यंत व विश्रामगृह ते केटीएम पर्यंत रस्ता बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले असून पुढे येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले.
या कार्यक्रमांमध्ये एड प्रकाश टेकाडे, मीना तायवाडे, प्रकाश वरुडकर, धनराज देवके, प्रगती मंडल आदींनी सुद्धा मार्गदर्शन केले. आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा सत्कार करणाऱ्यांमध्ये कळमेश्वर तालुका केमिस्ट ड्रगिष्ट संघटनेचे प्रमोद कोल्हे, प्रकाश पांडे, कळमेश्वर नगरपरिषद फुटपाथ संघटना विविध सामाजिक संघटना होमगार्ड सैनिक व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या कार्यक्रमाचे संचालन अजय बोरे, शुभांगी ढगे यांनी केले तर आभार रशीद शेख यांनी मानल.