सभापती संजय डांगोरे यांच्या हस्ते उद्घाटन. महिलांची उपस्थिती लक्षनीय. सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन.
अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन काटोल ८ जाने:- विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती च्या लोकांना पशू संवर्धन विषयक ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन तालुका लघु पशु चिकित्सालय काटोल येथे ७ जानेवारी ला पंचायत समितीचे सभापती मा.संजयजी डांगोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संजय डांगोरे सभापती पंचायत समिती काटोल. यांनी प्रशिक्षणार्थींना योग्य मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण मधून दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानचा वापर व त्याचा उपयोग या बाबतचे प्रगत ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून त्याचा उपयोग केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावू शकते. हा शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी कार्यक्रम असून त्याचा सर्व प्रशिक्षणार्थींनी जरूर लाभ घ्यावा असे आव्हान सुद्धा त्यांनी केले. या प्रसंगी निशिकांत नागमोते उपसभापती पं.स. काटोल, तसेच अनुराधा खराडे सदस्या पं.स, अरुण उईके सदस्य पं.स, लताताई धारपुरे सदस्या पं.स, चंदा देव्हारे सदस्या पं.स. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.राजेंद्र देशमुख सहायक आयुक्त पशुसंवर्धन काटोल यांचे तांत्रिक मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ.मनोहर लडूकर प वी अ, (वी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉ. अनिल गवळी यांनी संचलन केले.
यावेळीं डॉ.अशोक पखाले, डॉ. मयुर काटे, डॉ.इरोस सोमकुवर, डॉ.तुषार पुंड, कार्तिक मरसकोले,यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणा करीता काटोल तालुक्यातील बहुसंख्य प्रशीक्षणार्थिं उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

