लातूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. तो केवळ 18 वर्षाचा धनगर समाजाचा. तर तिचं वय जेमतेम 20 वर्ष ती मराठा समाजाची लातूरच्या टाकळी गावात ते दोघे ही राहात होते. दोघांची घरंही शेजारी होते. त्यामुळे लहान पणापासून दोघांची ओळख होती. लहानपणा पासून एकमेकांना पाहीलेलं. ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. पुढे शिक्षणा निमित्ता दोघे ही लातूरला गेले. तो आयटीआयचं शिक्षण घेत होता. तर ती पदवीचं शिक्षण घेतलं. पण प्रेमामध्ये जात आली अन् तिथचं होत्याचं नव्हतं झालं.
लातूर जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 27 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा दोन महिन्याच्या उपचारादरम्यान दुर्वैवी मृत्यू झाला आहे. लातूर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी गावात माऊली उमेश सोट या 18 वर्षीय तरुणाचं घराशेजारी राहणाऱ्या मुलीशी प्रेम संबंध जुळले. उमेश सोट हा आयटीआयचं शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलीशी त्याचं प्रेम जुळलं होते. त्यांच्या प्रेमाचा अंत अशा दुर्दैवी पद्धतीने होईल असं कुणीही विचार केला नसेल.
गेल्या एक वर्षापासून दोघांमध्ये अनेक गोष्टी घडल्या. डिजिटलच्या जमान्यात सुद्धा ते दोघे एकमेकांना प्रेम पत्र पाठवून आपलं प्रेम व्यक्त करत होते. जीवन मरणाच्या शपथा खात होते. पुढे जाऊन आपण लग्न करून सुखी संसार करण्याचं स्वप्न डोळ्यात होतं. मुलीकडून अनेकदा माऊलीला पळून जाऊन लग्न करण्याचा तगादा लावला जात होता. एकमेकांना रोज भेटून बोलणं हे दोघांचं नित्याचं ठरलेलं होत. कालांतराने दोघांच्याही घरी प्रेमाची भांडाफोड झाली. दोघांच्याही प्रेमाला कुणाची नजर लागली माहित नाही.
दोघांच्या ही स्वप्नाचा भ्रमनिराश झाला. मुलीच्या कुटुंबियांना माहित झालं की, आपल्या मुलीचे गावातीलच एका खालच्या जातीच्या मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे. माऊली हा त्या मुली पेक्षा खालच्या जातीचा होता. याची माहिती कळताच मुलीच्या कुटुंबीयांची तळ पायाची आग मस्तकाला गेली. यातूनच माऊलीला जिवे मारण्याचा कट शिजवला गेला. मुलीच्या कुटुंबीयांनी माऊलीशी बोलायचं आहे असा निरोप एक जणाकडे पाठवला होता. घरात आराम करत असलेला माऊली एका हकेवर घरातून बाहेर पडला. आई वडील हाक मारेपर्यंत माऊली रोडवर गेला. त्यामुळे त्याला आवाज आला नसावा. घरातून निघालेल्या माऊलीला माहित नव्हतं की आपण ज्यासाठी जातोय,तिथे आपल्याला मारण्यासाठी काही जण वाट पाहत बसले आहेत.
मुलीच्या कुटुंबीयांच्या समोर माऊली उभा टाकला. मुलीच्या वडिलांनी माऊलीला पाहताच त्यांच्या रागाचा पारा चढला. माऊलीला काही कळायच्या आतच त्याला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने काठ्या आणि रॉड ने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी भयाण होती की माऊली जागेवरच रक्तबंबाळ झाला होता. जमिनीवर एकचीत पडलेला होता. लोकांनी माऊलीच्या आई वडिलांना निरोप दिला की तुमच्या माऊलीला खूप मारहाण करण्यात आली आहे. हे ऐकून त्यांच्या आईवडीलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी माऊलीच्या दिशेने धाव घेतली.
ते तिथे पोहेचले त्यावेळी माऊली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याची स्थिती गंभीर होती. त्यामुळे त्याला लातूरला हलवण्यात आलं. मारहाण इतकी जबर होती की माऊली कोमात गेला होता. त्याच्या अंगावर सर्व ठिकाणी वार करण्यात आले होते. पाय फॅक्चर करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्या पासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तो मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याचा शेवटी मृत्यू झाला. त्याच्या हत्येचा गुन्हा आता नोंदवण्यात आला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनूसार माऊली उमेश सोट या तरुणाचे गावातीलच घराशेजारी राहत असलेल्या डुरे नावाच्या कुटुंबातील मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होते, ही माहिती मुलाच्या घरच्यांना समजली ती मुलगी नेहमीच मुलाच्या घरी येत असे तेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी अनेक वेळा त्या मुलीला समजावून सांगितले होते आमच्या मुलाचा नाद तू सोड, आमच्या तू घरी येत जाऊ नको, तरीही त्यांचे प्रेमप्रकरण चालच होते तसे अनेक पुरावे मुलीचे प्रेमपत्र मुलाचे आई-वडिलाकडे उपलब्ध आहेत, घटनेच्या दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी मुलीने मुलाला मुलीच्या घरी बोलावून घेतले (तिच्या घरच्यांनी प्लॅन करून) घरी आल्याबरोबर रात्रीच्या वेळी आठच्या सुमारास सर्व लाईट बंद केल्या आणि त्या मुलाला कायमचा संपवायचा या प्लॅनप्रमाणे मुलाच्या घरच्यांनी मुलाला साखळी, लाट्या काठ्यानी 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केली त्यात त्याची डोक्यापासून खालचे एकही हाड शिल्लक ठेवले नाही, त्या अवस्थेत त्याला त्यांच्याच घरासमोर फेकून दिले त्यानंतर ते सर्व मुलाच्या आई-वडिलांच्या घरी गेले तेथे जाऊन मुलाचे आई-वडिलांना नाही त्यांनी लाट्याकट्याने जब मारहाण केली व तुमचा मुलगा मरण पावला आहे तुम्ही त्याला घेऊन जा आणि पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान गावातीलच सरपंच व इतर काही समाज बांधव घटनास्थळी गेले असता त्यांनाही आरोपींनी पोलीस आल्याशिवाय या मुलाला येथून हलवायचं नाही असे म्हणून दम दिला, लोकांनी पोलिसांना फोन केला असता तब्बल दोन तासानंतर रात्री अकरा वाजता पोलिसांची गाडी आली तोपर्यंत तो मुलगा तिथेच विवळत मृत्यूची झुंज देत पडला होता त्याला जर लवकर दवाखान्यात नेऊ दिले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते त्यानंतर त्या तरुणाला लातूरमध्ये प्रथम पोद्दार हॉस्पिटल, गॅलेक्सी हॉस्पिटल, त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटल व पुढे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारास पाठवले असता दोन दिवसानंतर तो कोमामध्ये गेला उपचाराचा खर्च आजपर्यंत 20 ते 25 लाख जास्त झालेला आहे, डोक्यापासून खालचे सर्व हात पाय छातीच्या बरगड्या कंबर, मान सर्व हाडे तुटलेल्या होत्या तेव्हा डॉक्टरांनी तसे रिपोर्ट देऊन त्यांना त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही म्हणून घरी पाठवून दिले होते, दरम्यान 31 ऑक्टोबरला त्याच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता 1 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला, त्यात आरोपींची संख्या दहा ते पंधरा जनाची असताना फक्त सहा जणाविरुद्ध कलम 307 सारखे आताचे कलम 109 हाफ मर्डर चा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात कोणीही दखल न दिल्यामुळे तब्बल गुन्हा घडल्यापासून दीड महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सहा आरोपींना जेलमध्ये टाकले त्यात अजून मुख्य आरोपी चा समावेश आहे त्यांचेही काल पुरवणी याबाबत नाव घातले पण ते अजूनही फरार आहेत. काल मी पोलीस स्टेशनची संपर्क साधून संबंधित तपास अधिकाऱ्याकडून माहिती घेतली व आरोपीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात सांगितले आज त्यांचे मी प्रतीक्षा जाऊन भेटीही घेणार आहे. तो मुलगा दोन महिने मरण यातना भोगून 5 जनवरी 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजता दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोस्टमार्टम झाल्यानंतर दि. त्यांचा 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता अंत्यविधी झाला.
खोट्या जातीवादाच्या अहंकारात एक तरुण संपवला त्याचा खून केला, एक आईवडिलांचा आधार, बहिणीचा भाऊ कायमचा संपवला. या प्रकरणात दोन्ही कुटुंबातील एकत्र बसून यात मार्ग काढता आला असता, तरुण वयामध्ये हे मुलं असे चुका अनावधानाने करू शकतात त्यांना समजावून त्या दोघांचे समुपदेशन करता आले असते परंतु तसे न करता या लोकांनी डायरेक्ट या मुलाला हाल हाल करून मारले, या प्रकरनातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व अजूनही आणखी काही आरोपी मोकाट फिरत आहेत ते पकडले जावेत आणि याचा तपास सीआयडी कडे सोपवावा इत्यादी मागण्या आज सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.