Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोल्यातील पोलीस ठाणेदार व उपपोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाने खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 10, 2025
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोल्यातील पोलीस ठाणेदार व उपपोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाने खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पोलीस हे नागरिकांचे रक्षक असतात पण काही पोलीस हे विसरून नागरिकांना लुटण्यात धन्यता मानतात. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह निर्माण होते. अशीच खळबळजनक घटना अकोला येथील खदान पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांवर आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल व्हायची वेळ आली.

10 महिन्यांपूर्वी अकोला शहरातील मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर जवळ असलेल्या हॉटेल महाकालीच्या मालकाला खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे Dhananjay Sayare ह्यांनी हॉटेल चालवू देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. यावेळी हॉटेल मालकांनी पोलिसांना पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दहा महिन्यांपूर्वी महाकाली हॉटेल मध्ये पोलीसांनी बेकायदा प्रवेश करून हॉटेल मालकाच्या मुलाला जबरदस्तीने पोलिस स्टेशनला घेऊन जाऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेत जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते.

पोलिसांनी ही कारवाई 50 हजार रुपये देण्यास नकार दिल्याने खदान पोलिसांच्या या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन हॉटेल मालकाने दिले व त्यांचा विरोधात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ह्यापूर्वी बऱ्याचदा झालेल्या सुनावणीत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे हे एका गंभीर प्रकरणांत आरोपी असल्याने जवळपास साडे पाच महिने फरार असल्याने स्वतः अथवा वकीलाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यास असमर्थ असल्याने सदरहू प्रकरणाची सुनावणी लांबली होती.

खदान पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल सुपूर्द नाम्यावर परत मिळण्यासाठी संबंधितांनी न्यायालयातून आदेश देखील आणला होता. तरीही ह्या अधिकाऱ्यांनी तो देण्यास टाळाटाळ केल्याने त्याबाबतही हायकोर्टाला अवगत करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी अधिकार क्षेत्राबाहेर जावून वैयक्तिक फायद्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आल्याने नागपूर उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील याप्रकरणी शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तब्बल 10 महिन्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होवून खुलासा सादर करण्याबाबत दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पोलीस मार्फत नोटीस दिली होती.

नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील सरकारी पक्ष व फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे Dhananjay Sayare व सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश करंदीकर API Nilesh Karandikar यांच्यावर फिर्यादीवर अत्यंत बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केल्या बद्दल दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी अंतरिम आदेश पारित करीत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांना या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल हायकोर्टाला प्राप्त झाल्यावर या प्रकरणांत पुढील कारवाईसाठी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी ह्या प्रकरणाचा अंतिम आदेश पारित होण्याची शक्यता आहे.

Tags: Akola policeAkola SPKhadan police station AkolaPolice crime Akolaअकोल्यातील पोलीस ठाणेदार व उपपोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाने खळबळ.पोलीस क्राईम
Previous Post

अपघात प्रवण स्थळ निश्चितीसाठी संयुक्त तपासणी मोहीम राबवा.

Next Post

महाराष्ट्रात सैराटची पुनरावृत्ती, उच्च जातीच्या मुलीशी प्रेम केलं म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी केली घरी बोलावून तरुणाची हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाराष्ट्रात सैराटची पुनरावृत्ती, उच्च जातीच्या मुलीशी प्रेम केलं म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी केली घरी बोलावून तरुणाची हत्या.

महाराष्ट्रात सैराटची पुनरावृत्ती, उच्च जातीच्या मुलीशी प्रेम केलं म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी केली घरी बोलावून तरुणाची हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In