पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूरात अनैतिक संबंधातून पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिं. 9 जानेवारी रोजी समोर आली आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंधातून पती – पत्नी यांच्यात जोरदार भांडण झाले. हे विकोपाला जाऊन पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने आपल्याच पत्नीचे डोके भिंतीवर जोरदार आदळून तिची हत्या केली. त्यानंतर गंभीर अवस्थेत पत्नीला मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे डॉक्टरांना सांगितले की, ती पहिल्या माळ्यावरून पडल्याचा बनाव केला पण मुलीने दिलेल्या बायानातून या प्रकरणाचा खुलासा झाला. राखी पाटील वय 27 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे तर आरोपी पतीचे नाव सुरज पाटील वय 34 वर्ष असे आहे. हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह वय 5 आणि 3 दोन दिवसांपूर्वीच तुळजाई नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार लग्नाआधी दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सहा वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांचा विरोधात जाऊन यांनी प्रेम विवाह केला होता. दोघांचा सुखाने संसार सुरू होता, मात्र पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचे भूत शिरले आणि सुखी संसाराचा सत्यानाश झाला. पतीने पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून तिचे डोके भिंतीवर जोरदार आपटले. यात पत्नी जागीच गतप्राण झाली.
दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने भांडणे व्हायची. त्यामुळे राखी दोनदा घरातून पळून गेली होती. त्याबाबत सूरजने हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला सूरजच्या स्वाधीन केले होते.
पत्नीच्या हत्येनंतर तिला मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे ती पहिल्या माळ्यावरून पडल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी पोलिसांना सूचना दिल्यावर पोलिसांनी मेडिकलमध्ये दाखल होऊन चौकशी केली. सूरजच्या मोठ्या मुलीला विचारणा केल्यावर तिने याबाबत माहिती दिली. त्यातून या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी सूरजला बेड्या ठोकल्या आहे.