पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र पतंगाने आकाश सजले होते. पण जिल्हात पोलिसांनी नॉयलान मांजा वापरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू केली होती. पोलिसांच्या कारवाईला जुमानता अनेकांनी नॉयलान मांजाने पतंग उडविला. त्याचा फटका शहरात बऱ्याच दुचाकीचालकांना आणि वाटसरुंना बसला. त्यात दुचाकीने कर्तव्यावर जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला नॉयलान मांजा गुंडाळल्या गेला. नॉयलान मांजाने थेट नाकाजवळ अडकल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे नाक चिरल्या गेले. त्यामुळे या महिला पोलिसाचा जीव वाचला पण नाक चिरले.
डोक्याला नॉयलान मांजा गुंडाळल्या गेला नंतर या महिला पोलिस कर्मचारी हिने लगेच दुचाकी थांबवून डोक्याला गुंडाळेला मांजा काढला. पण नाक चिरल्यामुळे रक्तबंबाळ चेहरा झाल्यामुळे नागरिकांनी लगेच तिला खासगी रुग्णालयात नेले. ही घटना मकरसंक्रांतीच्या दिवशी सीताबर्डीत घडली. शीतल खेडकर असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शीतल खेडकर या सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अंंमलदार म्हणून कार्यरत असून आज दुपारी 2.00 वाजता त्या दुचाकीने कर्तव्यावर जात होत्या. दरम्यान, रस्त्यावरील एका खांबावर अडकलेला नॉयलान मांजा शीतल यांच्या डोक्याला गुंडाळल्या गेला. त्यामुळे त्यांनी हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मांजा शीतल यांच्या नाकाला घासल्या गेला. त्यामुळे शीतल यांचे नाक चिरल्या गेले. रक्ताची धार बघून त्यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. त्यांनी डोक्याला गुंडाळलेला मांजा बाजुला केला.
काही नागरिकांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. शीतलला बाजुला असलेल्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शीतलवर उपचार सुरु असून प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, नाक जास्त प्रमाणात चिरल्या गेल्यामुळे टाके लावून सुटी देण्यात येणार असल्याचे रुग्णालय विभागाने सांगितले.
शीतल खेडकर या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गुंडाळलेला मांजा सुदैवाने गळ्यापर्यंत पोहचला नाही. अन्यथा गळा चिरल्या गेला असता. शहरातील नॉयलान मांजा आता अनेकांच्या जीवावर उठला असल्याचे अनेकांचे मत आहे.

