Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !* *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
January 14, 2025
in गडचिरोली
0 0
0
आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !*   *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक – वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

कोरची – दि. 10/1/2025

समाजात आदर्श माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी वाचन अतिशय महत्वाचे आहे. वाचनानेच माणसाला चांगल्या वाईटाची जाण आणि सभोवतालाचे भान येते. जोपर्यंत आपण चांगले वाचणार नाही तोपर्यंत आपणाला चांगले लेखन करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते वाचन न करता अधिकाधिक अवांतर वाचन करण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी, असे आवाहन संगिताताई ठलाल यांनी केले. वनश्री महाविद्यालयात आयोजित ‘लेखक -वाचक संवाद’ या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील मराठी विभागाद्वारा ‘लेखक – वाचक संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे पी देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभागप्रमुख प्रा. सी. एस. मांडवे, डॉ. एम. डब्ल्यू. रुखमोडे, प्रा. जे. के. विनायक आदी उपस्थित होते.
यावेळी संगिताताई ठलाल यांनी वाचनाच्या आवडीमुळे त्यांच्या जीवनात कसे परिवर्तन झाले? कवयित्री, लेखिका व समीक्षक म्हणून त्यांना कशी दिशा मिळाली यावर प्रकाश टाकला. साहित्याची निर्मिती कशी होते? त्याचा आस्वाद घेतांना रसिकांची भूमिका काय असते? अशा अनेक अंगांनी त्यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. जे. पी. देशमुख म्हणाले की, साहित्य आणि जीवन यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे. साहित्यात जीवनाचेच प्रतिबिंब उमटले असते हे खरे परंतु जीवन आनंदाने कसे जगावे, ते साहित्य शिकवते. साहित्य हे माणसाच्या जाणिवा विकसित करून माणसाला समृद्ध करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साहित्याचे जास्तीत जास्त वाचन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रदिप चापले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. टी. देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एन. धिकोडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मौलिक सहकार्य केले.
—————————————-
प्रति,
मा. प्रतिनिधी
सर्व वृत्तपत्रे व वेब पोर्टल
महोदय,
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात / वेब पोर्टल वर प्रकाशित करून प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.

आपला विश्वासू
प्रा प्रदिप चापले
प्रसिद्धी प्रमुख
वनश्री महाविद्यालय कोरची

Previous Post

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली येथील तालुकास्तरावर तिसरा क्रमांक फटकावला.

Next Post

नागपूरात नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जीव वाचला पण नाक चिरल्या गेले.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
नागपूरात नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जीव वाचला पण नाक चिरल्या गेले.

नागपूरात नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जीव वाचला पण नाक चिरल्या गेले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In