पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संस्थापक फाउंडेशन अध्यक्ष वैद्यकीय मदत कक्षाचे, मंगेश चिवटे, वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष, रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनात व समाजकार्य प्रवेश कार्यक्रमाचे नेतृत्व पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम बघणारे महेंद्र मनोहर भुरे यांनी शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात प्रवेश केला.
काल संध्याकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांनी आपल्या धंतोली येथील शिवसेना विदर्भ कार्यालयात सर्व वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ पदाधिकारी नागपूर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती यावेळी महेंद्र मनोहर भुरे प्रवेश देण्यात आला.
त्यानंतर महेंद्र मनोहर भुरे यांची नियुक्ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये, नागपूर ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून प्रवीण लताबालमुकुंद शर्मा पुर्व विदर्भ प्रमुख यांनी केली. वैद्यकीय मदत कक्षचे पुर्व विदर्भच्या सर्व पदाधिकारी आणि नागपूर जिल्हा प्रमुख व नागपूर तालुकाच्या सर्व वैद्यकीय दूत यांच्या समक्ष त्यांची नियुक्ती करण्यात आली व यावेळी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे पुर्व विदर्भचे सर्व पदाधिकारी, तसेंच नागपूर जिल्हा पदाधिकारी व दूत या सर्वांनी महेंद्र मनोहर भुरे यांचे मनस्वी स्वागत व अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा प्रमुख सचीन शर्मा, महिला आघाडी पुर्व विदर्भ समन्वयक अश्विनी लिल्लारे, नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख राहुल हेडाऊ व शिल्पा रामेलवार, अंतन पुरी, अजय नवलकर, अंकित धुपे, सुनील पिल्ले, कार्यालय प्रमुख यशवंत डहाके हे सर्व वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी व दूत प्रवेश कार्यक्रमात उपस्थितित होते.

