१९७२ पासून ची काटोल जिल्ह्याची जुनी मागणी पुन्हा जोर धरीत आहे आमदार चरणसिंग ठाकुर लागले कामाला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर १८ जाने:- येत्या २६ जानेवारीला काटोल जिल्हा नवीन निर्माण करण्याची घोषणा सरकार ने करावी अशी काटोल पंचायत समिती चे सभापती तथा जिल्हा कृती समिती चे अध्यक्ष संजय डांगोरे यांनी सरकारला विनंती केलेली आहे. काटोल जिल्हा व्हावा अशी मागणी १९७२ पासून ची जुनीच मागणी आहे. काटोल मध्ये भौगोलिक आणि सर्व सुविधा असून जिल्ह्याचा दर्जा मिळत नसल्यामुळे जनता संताप व्यक्त करत आहे.
विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु शासनाच्या प्रस्तावित २२ नव्याने निर्मित जिल्ह्याच्या यादीमध्ये काटोलचे नाव नसल्यामुळे या भागात संतापाची लाट असून काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी नुकतीच या २६ जानेवारी ला विदर्भाचा विकास व्हावा म्हणून काटोल जिल्ह्याचा निर्मितीची घोषणा करावी असे शासनास विनंती केलेली आहे.
काटोल, वरुड, आर्वी आणि सावनेरचे आमदार यासाठी प्रयत्नात असल्याची चर्चा असुन काटोलचे आमदार चरणसिंग ठाकुर यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. नागपूर जिल्हा नऊ हजार चौरस हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला आहे. नागपूर जिल्ह्यात 13 तालुके असून शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात पोहोचण्याकरिता आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच १९७२ पासून काटोल जिल्ह्याची मागणी पुढे आलेली आहे. काटोल जिल्हा व्हावा याकरिता काटोल जिल्हा कृती समितीने धरणे आंदोलने, रास्ता रोको, स्वाक्षरी अभियान, सभा मोर्चे मोठ्या प्रमाणात या अगोदर काढलेले होते.
शासनातर्फे सर्वेक्षण होऊनी ५० वर्षापासून ज्या काटोल जिल्ह्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून इतर छोटे जिल्हे महाराष्ट्रामध्ये मागणी नसतांनाही निर्माण केले.
अनेक नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीत यामध्ये अनेकदा ठराव पास झालेले आहे. या जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सभे मध्ये सुद्धा सभापती संजय डांगोरे यांनी काटोल जिल्हा निर्मितीचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणली आणि सर्वानुमते शासनास विनंती करण्यात आली की काटोल जिल्ह्याची निर्मिती त्वरित व्हावी.
विदर्भाचा विकास करण्याकरिता आणि नागपूर शहरावरील आणि नागपूर जिल्हा वरील प्रशासनिक भार हलका करण्यासाठी त्वरित काटोल जिल्ह्याची निर्मिती व्हावी आणि येत्या २६ जानेवारी २०२५ ला काटोल जिल्ह्याची निर्मितीची घोषणा व्हावी असे विनंती काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी केलेली आहे.

