हिंगणघाट येथे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह समारोहात 25 जोडपे बांधले निकाह बंधनात.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दर वर्षी प्रमाणे या वर्षीय ही अल ख़िदमत फाउन्डेशन ने 19 जानेवारी 2025 मध्ये डॉ आम्बेडकर चौक जवळ शादी ग्राउन्ड परिसर येथे मुस्लिम समाज चे सामूहिक शादियों चे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंगणघाट शहरचे सर्व पाचही मस्जिद चे इमाम यांनी निकाह व खुदबा वाचला घेतला आणि नवीन दूल्हा दुल्हनचे वैवाहिक जीवनाची सुरुवात करन्यासाठी दुवा केली.
या सामूहिक विवाह समारोह मध्ये खासदार अमर काळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार समिर कुणावर, माजी आमदार राजू तिमांडे, एड सुधीर कोठारी, अतुल वंदिले, जमीर खान (जम्मूभाई वणी), मो रफीक पत्रकार, माजी नगरसेवक शेख प्यारू कुरैशी, सैयद प्यारू अली, रोटरी क्लब, नारायण सेवा मित्र परिवार आदि मान्यवरांचा सर्वप्रथम शाल आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी दूल्हा दुल्हन ला आपली शुभकामना देउन कमेटीचे आभार मानले.
यावेळी कमेटी चे सर्व पदाधिकारी आणि युवकांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करून असेच कार्यक्रम पुढेही घेण्यास प्रोत्साहित केले. अल ख़िदमत फाउंडेशन ने यावेळी सर्व दूल्हा दुल्हनला कमेटी तर्फे दहेज च्या रूपाने गृह उपयोगी साहित्य, तसेच दुल्हा दुल्हनच्या सर्व वरातियाना राहन्याची, जेवणाची व्यवस्था केली. ज्यामधे हजारोंच्या संख्येत लोकांनी भोजनचां आस्वाद घेतला. हा विवाह समारोह आयोजन साठी कमेटी च्या सर्वांच्या सहयोगाने कार्यक्रम सफल झाला. यावेळी कमेटी अध्यक्ष शेख नूर यांनी सर्वांचे आभार मानले.
यासाठी यशस्वी विवाह समारोह साठी कमेटी चे आसिफ शेख भाईजान, शेख साजिद जवाई, हामिद भाईजी, इमरान कुरेशी, सोहेल शेख, मुनाफ शेख, अज्जू शेख, इमरान क़ुरैशी, सैयाद सरफराज अली, शदाब अली, फारुख ताजी, तालिब, मोहसिन शेख, इरफान खान, नदीम अली, सलमान शेख, कलीम शेख, रजत शेख, असीम क़ुरैशी, काशिम क़ुरैशी, शाहिद क़ुरैशी, हामिद पठान, आसिफ अली दानिश बेग, राशिद क़ुरैशी, रजत शेख, दानिश आदि हिंगणघाट शहर चे सर्व मुस्लिम नवजवान, बुजुर्गों ने या आयोजन साठी अथक प्रयास केले.