मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व शिवसैनिक, युवासैनिक तथा महिला आघाडीतील पदाधिकारी दिनांक २३ जानेवारी २०२५ रोज गुरुवारला ठीक दहा वाजता आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाष चंद्र बोस तथा हिंदुहृदयसम्राट सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ जयंती निमित्त मिष्ठान वाटप कार्यक्रम तथा त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्याकरिता उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खूपसरे यांच्या निवासस्थानी तालुकाप्रमुख सतीश धोंबे उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेत पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करून पूजा अर्चना करण्यात आली. प्रास्ताविक पर माजी उपाध्यक्ष श्रीधर कोटकर यांनी शिवसैनिकांना या कार्यक्रमात संबोधन केले. तालुकाप्रमुख सतीश धोबे यांनी शिवसैनिकांना हिंन्दुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्द बाबत महत्त्व पटवून दिले. तसेच संघटन कौशल्य संघटित राहून ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करावे. असे सूचित केले. उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
तसेच हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित्य साधून शिवसेना च्या वतीने शहरातील बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शहरातील विविध ठिकाणी निराधार व निराश्रित उघड्यावर रात्री झोपलेल्या व्यक्तींना या थंडीपासून बचाव करण्याकरिता कंबल (अंथरून, पांघरून) वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पक्षाचे उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाणे, सतीश ढोमणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहमारे ,भास्कर ठवरे ,मनोज वरघणे, अविनाश धोटे, अनंता गलांडे, नितीन वैद्य, गजानन काटवले, चंगेश खान, दिलीप वैद्य, अनिल कडू, चंदू भुते, प्रशांत सुपारे, महेश धूरतकर, शितल चौधरी, महादेव लांबडे, दिलीप चौधरी, प्रशांत कांबळे, प्रकाश घोडे, गुणवंतजी वानखेडे, प्रकाश भुसारी, नरेंद्र गुलकरी, दिनेश धोबे, पप्पू घवघवे, अशोक सुरकार, बलराज डेकाटे, हिरामण आवारी, बाळू दाणी, फिरोज खान, नईम भाई, भास्कर भिसे, अतिक शेख, संजय रहाटे, अमोल वादाफळे,विजय कोरडे, लक्ष्मीकांत भगत, सोनू भगत, धनेश नवघरे, योगेश भुते, गोवर्धन शाहू, सतीश मेश्राम, संजय सोनूरकर, गणेश वडुले, योगेश डफ, शंकर देशमुख, शशिकांत नागोसे, हरदीप काळे, योगेश कामडी,उमेश धोबे, सुभाष काटकर सह मोठ्या प्रमाणात शिव सैनिक उपस्थित होते.