राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 20 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये डाँक्टरांना सर्जरी ब्लेड व काही खडे सापडले, मुंबई येथील केईएम रुग्णालयात या वेगळी केसमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये या वस्तू कशा गेल्या, याबाबत या तरुणीनेच पोलिसांची दिशाभूल केली. याबाबत पोलिसांनी कडून तपास केल्यानंतर मात्र एक धक्कादायक सत्य बाहेर आले आहे.
नेमकी काय आहे ही घटना: मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात 20 वर्षीय मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड व खडे आढळल्याने तिला पोलिसांनी तत्काळ केईएम रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी करत गुप्तांगातील सीझेरियन ब्लेड आणि काही दगड बाहेर काढले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्या 20 वर्षीय मुलीची चौकशी केली. यावेळी या मुलीने पोलिसांना सांगितले की, मी अनाथ असून वाराणसीतील एका काकांनी तिचा सांभाळ केला. त्यानंतर पोलिसांनी तिला विचारलं मुंबईला कधी व कशी आली विचारणा केली असता तिने आपल्या काका बरोबर 20 जानेवारी रोजी आपण मुंबईत आल्याचं सांगितलं.
सत्य बाहेर येताच पोलिसही चक्रावले: त्यानंतर पोलिसांनी काका, वाराणसी बाबत सखोल तपास केला. मात्र त्या मुलीच्या जबाबात पोलिसांना शंका आली. आणि डॉक्टरांनीही मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलेल्या वस्तूंबाबत शंका घेतली. पोलिसांनी नंतर त्यांच्या पद्धतीने तपास केल्यावर अनेक खळबळजनक सत्य उघडतीस आहे. ही तरुणी वाराणसीची नसून मुंबई येथील आहे, हे तपासात उघड झाले. शिवाय काका वगैरे कुणी नसून तिचे आईवडील नालासोपारा येथे राहतात, असंही पोलिसांना समजलं. या मुलीने केलेला बनाव पोलिसांना उघड पडला. त्यानंतर पोलिसांनी तिला बोलतं केलं. तीने जे सांगितलं ते ऐकूण मात्र पोलिसही चक्रावले आहे.
कोण आहे ही मुलगी?: ही मुलगी नालासोपारा येथील असून तिचे वडील फळविक्रीची हातगाडी चालवतात. आई परिसरात घरकाम करते. वडिलांचा स्वभाव रागीट असून कुटुंबात नेहमी वाद होत असतो. या कुटुंबिक वादाला कंटाळून ही मुलगी 21 जानेवारी रोजी नालासोपारा रेल्वे स्टेशनला गेली. तेथे तिला राजरतन सदाशिव वायवळ वय 32 वर्ष हा रिक्षाचालक भेटला. या मुलीनं त्याला आपल्या घरची कथा सांगितली. राजरतनने मुलीची गरज ओळखून तिला जाळ्यात ओढले. त्यांनतर तिला घेऊन तो अर्नाळा येथे गेला. तेथे तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला. त्यानंतर तो मुलीला घेऊन पुन्हा नालासोपाऱ्यात आला.
मग केलं नाटक?: हे सगळं झाल्यावर नालासोपारा येते आल्यावर मुलीला भिती वाटू लागली. घरी गेलं आणि आपल्या आईवडिलांना हे माहिती झालं तर आपल्याला ते जिवंत ठेवणार नाहीत, असं समजून तिने एक प्लॅन केला. त्यानंतर तिने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये सर्जिकल ब्लेड व खडे टाकले. मात्र ते टाकल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला. त्यात ती पोलिसांच्या हाती सापडली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिच नाटक उघड पाडले व राजरतन या रिक्षाचालकाला अटक केली.