🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- जिल्हातील समुद्रपुर तालुक्यातील नंदोरी येथील 25 ते 30 वर्षा पासून गावातील नागरिक आपल हक्काचं घरट उभारून आपल्या परीवराबरोबर वास्तव्य करीत आहे. पण हक्काच्या घरची जागेचे पट्टे तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे आज वर्धा जिल्हा विकास आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले.
नंदोरी गावातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वार्डतील सर्व नागरिक ग्रामपंचायतच्या सर्व टॅक्स भरणा करीत आहे. विघुत बिल सुद्धा नियमित भरत आहे. तरी सुध्दा आज पर्यंत तिथे राहणाऱ्या नागरिकांना स्थाई पट्टे मिळाले नाही. संपूर्ण वर्धा जिल्हामध्ये पट्टे वाटपाच काम जोरात सुरू आहे. तरी नंदोरी गावातील शेकडो परिवार या सुविधा पासुन वंचित का हा गभीर प्रश्नन आहे.
जेव्हा केंद्र सरकार विविध योजनेच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी घर देण्याचे आश्वासन देत आहे आणि 25 ते 30 वर्षा पासून राहणाऱ्या लोकांना साध्ये पट्टे मिळत नसेल तर प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नंदोरी गावातील सर्व नागरिकांना नियमा नुसार स्थाई पट्टे मिळावे अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडी वतीने उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे, चारू आटे, अर्पिता कांबळे, दारभा खेडकर, नर्मदा पाटिल, वंदना चिकाटे, आशा रामटेके, माधुरी खेडकर, बेबी नगराळे, प्रतीभा नगराळे, शालीना धाबर्डे, विमल भगत, रमाबाई लोहकरे, अम्रपाली कांबळे, वनिता परमोडे, गिला गरत, वर्षा पाटील, निळवती पाटील, सोमिला मस्के, भागरताबाई मुंजेवार, रमाबाई कांबळे, चंदाबाई बुरबुरे, चंदाबाई गेडाम, जिवन उरकुडे, देवेन्द त्रिपलीवार, प्रदिप कोल्हे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

