राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर उपक्रम.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक २५ जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राजुरा काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारा विरोधात जनजागृती करीत निष्पक्ष निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी करीत सकाळी ११ : ४५ वाजता राजुराचे नायब तहसीलदार चंद्रशेखर तेलंग यांच्या मार्फत आयुक्त भारत निर्वाचन आयोग यांना निवेदन देण्यात आले. आणि निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती वजा मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, सभापती विकास देवाळकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, कविता उपरे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, तिरुपती इंदूरवार, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, भुषण बानकर, रामभाऊ ढुमणे, अशोक पिंपळकर, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, प्रणय लांडे, अशोक राव, संघपाल देठे, संतोष मेश्राम यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.