श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्हात सरपच हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांच्या करीबी वाल्मीक कराड यांच्या वर कारवाई झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येत असताना यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार झटका दिला आहे. यापूर्वीच्या मंत्रीमंडळाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यामुळं ते गोत्यात आले आहेत. यामध्ये अनेक अधिकारी देखील गुंतले आहेत. त्यामुळं या अधिकाऱ्यांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
काय आहे ही घटना?
धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना शेतात कीटकनाशक फवारणी पंपाच्या खरेदीत घोटाळा झाला होता. याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या उच्च न्यायालयाच्या या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. यामध्ये तत्कालीन जे अधिकारी गुंतले आहे, त्यांचा अडचणीत वाढ होणार आहे. यामध्ये 2600 रुपयांचा कृषीपंप 3650 रुपयाला खरेदी करण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडं याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.
उच्च न्यायालयाच्या गंभीर सवाल?
राज्याच्या कृषी सचिवांनी नकार देऊनंही तत्कालीन कृषिमंत्र्यांनी शेतात कीटकनाशक फवारणी पंपांची किमती पेक्षा अतिरिक्त दरानं खरेदी केली होती. कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. 2023 मध्ये राज्य सरकारनं कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केली आहे. यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.