मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
२० जानेवारी पासून २६ जानेवारी पर्यंत रोज माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
दि.२०-१-२५ ला विद्यार्थ्यांची *भाषण स्पर्धा* घेण्यात आली. या निमित्ताने श्री आनंदराव अलोणे व श्री चुडाराम भेंडारकर यांनी चांगले वक्ते बनण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यात उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. पल्लवी माहोरकर वर्ग १२ वी व द्वितीय क्रमांक कु. संध्या मेश्राम ने पटकावले. तसेच माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. नम्रता मोहूर्ले व द्वितीय क्रमांक कु. मनिषा निकेसर ने पटकावले.
दि.२१ जानेवारी ला विद्यार्थ्यांची *देशभक्ती गीत गायन स्पर्धा* घेण्यात आली. या निमित्ताने कु. लैजा चालूरकर यांनी स्पर्धेचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन केले.
त्यात उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. ममिता चौधरी वर्ग १२ वी ने पटकावले. तसेच माध्यमिक गटात प्रथम क्रमांक कु. पार्वती ताटेपल्ली व द्वितीय क्रमांक कु. नम्रता मोहूर्ले ने पटकावले.
दि.२२ जानेवारी ला विद्यार्थ्यांची *चित्रकला स्पर्धा* घेण्यात आली. या निमित्ताने श्री बंडू ताजणे यांनी स्पर्धेचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन केले.
त्यात उच्च माध्यमिक गटात चित्रकला प्रथम क्रमांक कु. संध्या मेश्राम वर्ग १२ वी ने पटकावले. तसेच माध्यमिक गटात चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. पार्वती ताटेपल्ली ९ वी व द्वितीय क्रमांक कु. नम्रता मोहूर्ले १० वी व तृतीय क्रमांक कु. पल्लवी शेंडे ९ वी ने पटकावले.
दि.२३ जानेवारी ला विद्यार्थ्यांची *निबंध स्पर्धा* घेण्यात आली. या निमित्ताने श्री बंडू ताजणे व श्री चुडाराम भेंडारकर यांनी स्पर्धेचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन केले.
त्यात उच्च माध्यमिक गटात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. संध्या मेश्राम वर्ग १२ वी ने पटकावले. तसेच माध्यमिक गटात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. रोहिणी निलम १० वी, द्वितीय क्रमांक कु. कोमल बोंदलवार ८ वी व तृतीय क्रमांक कु. तनवी बंडू मराठे ८वी ने पटकावले.
दि.२४ जानेवारी ला विद्यार्थ्यांच्या *विवीध क्रीडा स्पर्धा* घेण्यात आल्या. त्यात कबड्डी, व्हालीबॉल, रस्सा खेच, धावणे, चमचा गोळी, संगीत खुर्ची, समय सुचकता, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात यादीत दिल्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.
या स्पर्धांचे प्रमुख श्री रेवनाथ लांजेवार व श्री आनंदराव निखाडे हे होते.
दि.२५ जानेवारी ला विद्यार्थ्यांच्या *रांगोळी स्पर्धा* घेण्यात आली. यात कु. माधुरी व कु. प्रतिक्षा या विद्यार्थ्यीनीनी प्रथम क्रमांक पटकावले.
या स्पर्धांचे प्रमुख श्री आनंदराव निखाडे हे होते.
२६ जानेवारी ला सकाळी ८ वाजता ध्वज फडकवण्याचा मान माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४ मध्ये ७८% गुण मिळवून शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थीनी कु. दिक्षीता नारायणजी कुळमेथे हिला देण्यात आला. व मान्यवरांचा हस्ते पुरस्कार म्हणून तिला रोख ₹५००/-, घड्याळ व पेन देण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत नृत्ये व नाटीका सादर करण्यात आल्या. व नंतर मान्यवरांचा हस्ते सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या निमीत्ताने मुख्याध्यापक/ प्राचार्य डॉ. संजय भांडारकर यांनी पालक व विद्यार्थ्यांना देशभक्ती जागृत करण्यासाठी व प्रजासत्ताक दिनानिमीत्त मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी व सर्वांनीच देशसेवा करण्याकरीता सैन्यातच कार्य करने अनिवार्य नाही तर सैनिकांना, पोलिसांना, न्याय व्यवस्थेला सम्मान देवून देश हिताचे कार्य करने, स्वच्छता राखणे, नियम पाळणे, मदत करणे, असे कार्य करणे म्हणजे पण देश सेवा होते, हे समजावून सांगितले.
श्री आनंदराव अलोने यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रमाला गावातील मान्यवर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक उपस्थित होते.
शिक्षक कु. लैजा चालूरकर, श्री बंडू ताजने, श्री रेवनाथ लांजेवार, श्री चुडाराम भेंडारकर, श्री संजय पथाडे, श्री आनंदराव निखाडे तसेच वर्ग ८ ते १२ चे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.