रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- पत्रकार समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम (CSID) स्कूल परतुर ने प्राथमिक गटामधून परतुर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य कला सादर करून त्यांच्या गुणांचे प्रदर्शन केले. यामध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नृत्याच्या अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेने आणि ऊर्जा भरलेल्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळाच आयाम मिळवून दिला. हा कार्यक्रम शाळेसाठी नव्हे तर पूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक प्रतिभेला वाव देणारं व सर्वांसाठी प्रेरणादायी असे नृत्य विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर सादर केले होते. या कार्यक्रमांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या या जबरदस्त मेहनती साठी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके, शाळेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी भरभरून कौतुक केले. हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका लंका भवर, उप मुख्याध्यापक अरुण चंदने, व्यवस्थापक शेषनारायण बिल्लारे, पुरुषोत्तम मगर यांनी अथक परिश्रम घेतले.

