मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रतील शिवसैनिकांना आदेश देऊन सूचित करण्यात आले होते की गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील शिवसेना शाखेत भारत मातेच्या प्रतिमेचे व आपले भारताचे संविधानाचे पूजन करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 25 जानेवारी रोज शनिवारला सायंकाळी ठिक 5.00 वाजता उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खूपसरे यांच्या हॉलमध्ये भारत मातेच्या तथा भारताचे संविधान पूजन कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
सदर कार्यक्रम उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमात सर्व प्रथम भारत मातेच्या तथा भारताचे संविधानाचे सर्व शिवसैनिक, युवा सैनिकांनी नतमस्तक होऊन पूजा अर्चना केली. त्या ठिकाणी प्रास्ताविकपर मनीष देवढे यांनी शिवसैनिकाना भारत माता प्रति व भारताच्या संविधानाप्रती सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख सतीश धोबे तथा राजेंद्र खूपसरे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, देश स्वतंत्र झाला पण २०१४ साला पासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार शासकीय यंत्रणा आपल्या हाती घेऊन संविधानाच्या चौकटीत न राहता देशात हुकूमशाहीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष आणीबाणीचे वातावरण निर्माण केले आहे. हे सरकार सर्व सामान्य लोकांवर दडपशाही करून पहात आहे. एखाद्याने जर आवाज उचलण्याचे प्रयत्न केले तर तो कारागृहात दाबल्या जाईल किंवा जीव गमवावा लागेल अशी अवस्था या सरकारने केली आहे. आपल्या अधिकारावर अप्रत्यक्षपणे बंदी घालण्याचा प्रयत्न चालू आहे. काही दिवसांनी या सरकारला स्वतंत्र दिन आणि गणतंत्र दिन मान्य राहील कि नाही हा सुध्दा जनतेला प्रश्न पडला आहे. पाहता पाहता चार वर्ष होऊन गेले तरी महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत चे निवडणुका घेण्यात आल्या नाही, यावरून असे दिसते कि या वर्तमान सरकारला एक हाती अधिकार ठेवायचे आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या अधिकारासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातुन दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून असल्या हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढा उभे करावे लागेल.
या कार्यक्रमाचे संचालन उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने केले आणि सांगता राष्ट्यगीताने झाली. या कार्यक्रमात शंकर मोहमोरे, भास्कर ठवरे, गजानन काटवले, नितीन वैद्य, अविनाश धोटे, बलराज डेकाटे, दिनेश धोबे, सुनील आष्टीकर, प्रशांत सुपारे, प्रकाश भूसारी, गुणवंतराव वानखेडे, मोहन वानखेडे, पप्पू घवघवे, अनंता गलांडे, नरेंद्र गुळकरी, भास्कर भिसे, भास्कर मानकर, अमोल वादाफळे, सोनू भगत, नईम शेख, महेश धुरतकर, हिरामण आवारी, विजय कोरडे, अनंता सोरटे, धनेश नवघरे, विलास धोबे, सुभाष काटकर, राहुल मोहितकर, सचिन मुळे, नरेश भजभूजे, पंकज ठाकरे, अतिक शेख, फिरोज खान, संदेश मानकर, विनोद ढगे इ. शिवसैनिक उपस्थित होते.