प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- संस्कार बहुउद्देशिय संस्था पिपरी मेघे व बि.एम.डल्यूील कमेटी बोरगाव मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एम.डब्ल्यु मैदान गणेशनगर बोरगाव मेघे येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच योगिता देवढे, विरु पांडे, श्री. कोचर, महेश वाघ, बालुभाऊ वरघने आदी उपस्थित होते.
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना वर्धा नाईट राईडर विरुध्द बेटा पार्वती यांच्यात झाला या अंतिम सामन्यात वर्धा नाईट राइडर संघ विजेता ठरला. या विजेत्या संघाला डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार 60 हजार रुपये व उपविजेत्या संघास 40 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्या संघाना मॅन ऑफ मॅच, मॅन ऑफ सिरीज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाजाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लॉयन्स फुड फेस्टला पालकमंत्री यांची सदिच्छा भेट
राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वावलंबी मैदानावर आयोजित लॉयन्स फुड फेस्टला सदिच्छा भेट दिली. यावेळी लायन्स सुरेंद्र महाकाळकर यांनी डॉ. पंकज भोयर यांचे स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सुनील गफाट, लॉयन्स क्लबचे रिपल राणे व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.