मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ग्रामीण युवकांनी मैदानी खेळातून शारीरिक विकास साधावा. कब्बड्डी खेळातून निर्णायकता आणि गुणकौशल्य विकशीत होते. तर मानसिक आरोग्य चांगले राहते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सीताराम भुते यांनी केले. ते भवानपूर येथे भूमी ग्रामीण कृषी विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एक दिवशीय कबबडी स्पर्धेच्या बक्षीस समारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी उदघाट्न प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सीताराम भुते, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र झाडें, खेमाजी राऊत, वासुदेव भोयर, राजेंराम भिसेकर, प्रभाकर चामचोर, दिलीप तुपे, राकेश चंदनखेडे, गंगाधर गिरडे, नानाजी राऊत, अशोक गलांडे, अरुण शेलोरे , बालू खोंडे, अल्पेश तुपे, लखन खोंडे, प्रवीण जिभकाटे , भगवान राऊत, डॉ.राधेशाम महाकाळकार यांची उपस्थिती होती.
या कब्बड्डी सामान्यात २५ संघांनी सहभाग घेतला होता. यात गिरडच्या सोनामाता क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकविले. बेला येथील गुरुदेव क्रीडा मंडळाने दूसरे पारितोषिक तर वाहनगाव बोधली येथील संघाने तिसरे पारितोषिक पटकाविले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला शाल व श्रीफळ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.