आदर्श शाळेच्या माजी विद्यार्थीनीचे घवघवीत यश. शिक्षक बादल बेले यांनी केला प्रांजली चा संविधान पुस्तक भेट देऊन सत्कार.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 28:- परदेशातुन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी व डॉक्टर या व्यवसायाचा सराव करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना भारतातील विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही परीक्षा अतिशय कठीण असल्याने भारतात या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी फार कमी प्रमाणात आहे. या परीक्षेत नुकतीच बामनवाडा येथिल रहवासी प्रांजली आशा हिराजी वेलादी या विद्यार्थिनीने किरगिझस्थान येथिल ओश स्टेट विद्यापिठातुन वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये झालेली विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्याने तीचे निवासस्थानी भेट देऊन शिक्षक बादल बेले, सुवर्णा बेले यांनी शोल, भारताचे संविधान पुस्तक, वृक्ष कुंडी भेट देऊन सत्कार केला. यावेळी तिचे आई वडील व भाऊ उपस्थीत होते.
भारतातील वैद्यकीय शिक्षण खर्चिक असल्याने प्रांजलीने विदेशात आपले शिक्षण पूर्ण केले. भारतातील अनेक विद्यार्थी विदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहे. ते शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना भारतात वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्यासाठी व वैद्यकीय क्षेत्रात सराव करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळ व्दारे आयोजित विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतरच त्यांना भारतात भारतीय वैद्यकीय परिषद द्वारे (मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडीया) कायम स्वरुपी नोंदणी करता येते. बामनवाडा येथिल प्रांजली वेलादी या मुलींने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात जानेवारी महिन्यात झालेल्या परीक्षेत यश मिळविले असून तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रांजली वेलादी हीचे प्राथमिक शिक्षण राजुरा येथिल आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथून पुर्ण झाले. जवाहर नवोदय विद्यालय मधून पुढील शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय पदवी किरगिझस्थान येथिल ओश स्टेट विद्यापिठातुन पुर्ण केले आहे. तीच्या सोबत त्याच विद्यापीठात राजुरा येथिल श्रृती किंगे आणि रामपुर येथील समीक्षा झाडे या दोन मुली सुध्दा विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
डॉक्टर प्रांजली वेलादी हिचा माजी आमदार सुदर्शन निमकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक केशवराव ठाकरे, प्रदीप बोबडे, नितीन बांब्रटकर यासह अनेक संस्थेचे संघटनेचे व मान्यवरांनी सत्कार केला आहे. प्रांजली च्या यशाबद्दल बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माजी आमदार अँड.संजय धोटे, अध्यक्ष सतिश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक मंडळ, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.