प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी बोरगाव मेघे येथील गणेशनगर मैदानावर महिलांसाठी खास हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विदर्भातील प्रथम तृतीयपंथीय ऍड.शिवानी सुरकार, अंबिका हिंगमीरे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला दोन हजार पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमात रूढी परंपरेला फाटा देत विधवा महिला भगिनींचे सुद्धा हळदी कुंकू करून त्यांचाही सन्मान वाढविला. सर्व महिला भगिनींचे हळदी कुंकू करून त्यांना वाण सुद्धा देण्यात आले. वर्षातील पहिला आणि सुंदर कार्यक्रम म्हणून अंबिका सोशल फाऊंडेशनने केलेले आयोजन म्हणजे बोरगाव मेघे वासीयांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली.