अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- चार महिन्या आधी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील परिसरात मनोरुग्ण सोनू नामक महिलेचे वास्तव्य असताना हिंगणघाट येथील ठाणेदार मनोज गभने यांनी यासंदर्भात चिमूर येथील दिव्य वंदना फाउंडेशनचे शुभम राजू पसारकर यांना माहिती देत तिला हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन परिसरातून रेस्क्यू करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जामगाव या ठिकाणी शुभम राजू पासारकर हे दिव्य वंदना फाउंडेशन कडून बेवारस निराधार मनोरुग्ण असणाऱ्यांना रेस्क्यू करत ते त्यांना योग्य उपचार आणि देखभालीचे कर्तव्य पार पाडत आहे.
दिव्य वंदना फाउंडेशन कडून चार महिने आधी हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरातून रेस्क्यू केलेली सोनु मानसिक परिस्थितीतून सावरली असून ती २७ जानेवारी रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे औपचारिक भेटीला आली असता, सोनु ने ठाणेदार मनोज गभने यांचा सह अनेकदा आपल्या जुन्या भेटीतील पोलीस कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांच्या भेटी पोलीस स्टेशन मध्ये घेतल्या. सोनूच्या या भेटीमुळे सर्व पोलीस परिसर भारावून गेला होता. चार महिन्यानंतर सोनू मध्ये झालेला बद्दल आणि मनोरुग्ण असलेली बेवारस सोनू अक्षरशः सुधारित अवस्थेत पाहून हिंगणघाट पोलीस स्टेशन भारावून गेले होते.