अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयात दि. २३ व २४ जानेवारीला दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन युवा अविष्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनाचा मूळ उद्देश असा होता की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. यात खेळ, सास्कृतिक आणी शैक्षिणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनाचे उदघाटन डॉ. प्रा. उषाकिरण थुटे अध्यक्षा, ग्रामीण विकास संस्था हिंगणघाट यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ. राजकुमार खापेकर पर्यावरण तज्ञ तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सिंधू महाविद्यालय नागपूर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात विशेष करून सांगितले की, भगवान जब भी देता है तो छप्पर फाडके देता है, मात्र त्यासाठी आपल्याला आपले छप्पर तर करावे लागेल म्हणजेच आपल भविष्य चांगलं करायचं असेल तर आपल्याला मेहनत करावीच लागेल. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो परंतु मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण करेलच असे नाही. असे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी मुलांना सुखी आणी आनंदी जीवनाचे मार्ग दाखवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती डॉ. शरद विहिरकर यांची होती.
उदघाटनीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. मनीषा रिठे यांनी तर आभार प्रा. सुशांत मस्के यांनी मानले.
या दोन दिवसात खेळातील विविध स्पर्धा जसे, कबड्डी, धावणे, गोळाफेक, स्लो सायकलिंग, इत्यादी घेण्यात आल्या आणी विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक स्पर्धामध्ये वादविवाद, निबंध, काव्य वाचन, चित्रकला, रांगोळी, स्वयंस्फूर्त भाषण इत्यादी स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात आले आणी विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्कृतिक स्पर्धामध्ये एकलं नृत्य, ग्रुप डान्स, गीतगायन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना पदक आणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे नियोजन विविध समित्यांच्या माध्यमातून करण्यात आले ज्यात सल्लागार, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ, पत्रिका बॅनर, प्रमाणपत्र लेखन आणी भोजन समित्यांची भूमिका महत्वाची होती.
संमेलनाचा समारोप आणी बक्षीस वितरण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली डॉ. विहिरकर, डॉ. झाडें, डॉ. निखाडे, डॉ. अल्लेवार आणी श्री. चंद्रशेखर कुटे यांचे उपस्थितीत करण्यात आले. श्री. कुटे यांनी संपूर्ण स्नेहांसंमेलन यशस्वी करणाऱ्यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.