अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील नांद्रा (आष्टा) येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 12.00 वाजता करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी याच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतरावजी चतुर, समुद्रपूर बाजार समितीचे संचालक अरुण बकाल, हेमंत पाहुणे, माजी प. स. सदस्य रामेश्वर बरडे, सरपंच ललिता सयाम, ग्रामपंचायत नांद्रा उपसरपंच गुरूदास मारबूदे, कवडू उईके, संजय शेगोकार, त्रंबकराव उईके, योगेश्वर कुडमते, संजय हिवंज व तुकाराम वलके तसेच कमेटी अध्यक्ष गुरुदेव उईके, उपाध्यक्ष रत्नाकर उईके, कोष्याध्यक्ष मंगेश उईके, सचिव श्याम कुडमते, सहसचिव कैलास वलके व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित समाज बांधव, भगीनी व गावकरी मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.