अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेने ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात इंडियन मेडीकल असोसिएशन सावनेरचे अध्यक्ष डॉ.परेश झोपे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर डॉ.परेश झोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण राष्ट्रभक्तीमय झाले आणि उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली.
यावेळी अध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या देशाच्या संविधानाचे महत्त्व, त्यातील मुल्ये आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी यावर प्रेरणादायी भाषण दिले. त्यानंतर उपस्थितांना देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देण्यात आली. यावेळी समाजात आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे आणि सेवा भावनेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. इंडियन मेडीकल असोसिएशन सावनेर शाखेने राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा यांचा संगम साधत प्रजासत्ताक दिनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
यावेळी मोठ्या संख्येने आयएमचे सदस्य डॉ. स्मिता भूडे उपाध्यक्ष, डॉ. अमित बाहेती उपाध्यक्ष, डॉ. शिवम पुण्यानी कोषाध्यक्ष, डॉ. विशाल महंत सहसचिव, डॉ. विजय धोटे, डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. अशोक देशमुख, डॉ. ज्योत्सना धोटे, डॉ. करुणा बोकडे, डॉ.संगीता जैन, डॉ. संदीप गुजर, डॉ. रवी ढवळे, डॉ.प्रीतम निचत, डॉ. सचिन घटे, डॉ.स्वाती पुण्यानी, सौ.चित्रा झोपे, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. आशीष चांडक, डॉ. रेणुका चांडक, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. विलास मानकर, डॉ. गौरी मानकर, डॉ.मयूर डोंगरे, डॉ. मीनल डोंगरे, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. नरेंद्र डोमके, डॉ. कांचन डोमके, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयएमचे सचिव डॉ.प्रविण चव्हाण यांनी केले.