राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवुन नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.
✒प्रशांत जगताप, 9766445348
हिंगणघाट:– 26 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव हिंगणघाट शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावातावरण साजरा करण्यात येत आहे. त्यात हिंगणघाट शहरातील प्रसिद्ध माँ राणी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या प्रयत्नातून दुर्गेची मुर्ती हिंगणघाटची महाराणी म्हणुन प्रसिद्ध असलेली देवीची स्थापना करण्यात आली.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. पुढील 9 दिवस हिंगणघाट ची माँ राणीची भक्ती भावाने विधीवत पूजा करण्यात येते त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुलभाऊ वांदीले, अमोल बोरकर आणि इतर कार्यकर्ते प्रमुख्याने भाग घेतात.
भव्य नवरात्री गरबा उत्सव 2022
माँ राणी नवरात्र उत्सवात या वर्षी मोठ्या गरबा दांडिया उत्सवाची परंपरा जपण्यात येत आहे. सर्वांना गरबा दांडिया उत्सवात भाग घेता यावा म्हणून अतुलभाऊ वांदिले यांनी खास प्रयत्न केले आहे. त्यांच्या विशेष पुढाकारातून हिंगणघाटची माँ राणी विराजमान असलेल्या परिसरात भव्य गरबा दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक जबाबदारी..
माँ राणी नवरात्र उत्सव हिंगणघाट तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या हिंगणघाटची महाराणी उत्सवानिमीत्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवीण्यात येत आहे. समाजाच्या कल्याणासाठी झटलेल्या महामानवाचे विचार हे या उत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे. सर्व समाजाला एका गाठेत बांधणाऱ्या हा उत्सवात शहरातील हजारो नागरिक रोज सहभागी होऊन या उत्सवाची परंपरा जपत आहे.
मागील वर्षी कोरोना वायरसच्या महामारीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुलभाऊ वांदीले यानी शहरातील गरीब परीवाराला मोठ्या प्रमाणात मदत केली होती आणि हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणावर सैनिट्राझरची फवारनी करुन मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचा सामाजिक कार्याचे कौतुक जिल्हा स्थरावर करण्यात आले होते.
तरी माँ राणी नवरात्र उत्सव हिंगणघाट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंगणघाटची माँ राणी उत्सवात भाग घेऊन सर्वानी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. आपल आरोग्य सांभाळावे अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा माँ राणी नवरात्र उत्सव हिंगणघाटचे अध्यक्ष अतुलभाऊ वांदीले यानी केली आहे.

