✒️ युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- ओगावा सोसायटीच्या वतीने 66 वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कामठी शहरातील ड्रैगन पैलेस टेंपल येथे दिनांक 4 व 5 ऑक्टोंबर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवस विविध संस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री अँड सुलेखा कुंभारे यांनी दिली या महोत्सवाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दि. 4 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता ड्रैगन पैलेस टेंपल कामठी आवारातील दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केली जाईल. यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिली जाईल. सकाळी 11 वाजता केंद्रीय सामाजिक व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल. दुपारी 12 वाजता वर्ग पाचवी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा वाजता संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
बुधवारी दि. 5 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता भिकू संघाचे उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व त्यानंतर सकाळी 11 वाजता धम्मचक्र महोत्सवाला सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात केली जाईल. या समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र गवई, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या रिंगण उपस्थित राहणारा अशी माहिती सुलेखा कुंभारे यांनी दिली.
ड्रैगन पैलेस टेंपल कामठी येथे आयोजित धम्मचक्र महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर बी.पी नितनकर यांनी गुरुवारी दिनांक 29 रोजी ड्रैगन पैलेस टेंपल कामठी येथे आढावा बैठक घेऊन संपूर्ण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नागरिकांसाठी लागणारे पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्त्याची दुरुस्ती, पार्किंगची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, कायदा व सुव्यवस्था याबाबत माहिती जाणून घेत या संपूर्ण बाबीचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अँड सुलेखा कुंभार, उपविभागीय अधिकारी श्याम मदनकर, तहसीलदार, अमर हाडा ठाणेदार संतोष वैरागडे, मुख्य अधिकारी संदीप बोरकर जनबंधू, उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर नयना दुखाले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

