या कार्यक्रमाचा चिमुकल्यांनी घेतला आई-वडिलांसह खेळाचा आनंद.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जिजस सोसायटी राजुरा, द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे नर्सरी ते इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी फॅमिली फंडे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह विविध खेळ, नृत्य आणि विविध शालेय उपक्रमांचा आनंद घेतला. यात प्रामुख्याने बुक बॅलन्सिंग, बलून बस्टिंग, पासिंग द बॉल, रिले रेस, फाइंडिंग मॉम अँड पासिंग द बॉल, कोन बॅलेंसिंग, पासिंग लेमन, फॅमिली बुक बॅलेंसिंग, पासिंग द ग्लास. तसेच टगफवार या खेळांचा पालक वर्गाने आनंद घेतला. अनेक पालकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल शिरसागर व शुभम बन्नेवार यांच्यासह शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षेकत्तर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

