मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*कुरखेडा:-* अखिल भारतीय सर्व वर्गीय कलार महिला संघटन गोंदिया यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय महिला महा संमेलनाचे आयोजन २ मार्च रोजी यशोदा सभागृहात करण्यात आले होते. सर्व प्रथम कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहू अर्जून राजराजेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीपप्रज्वलन भोपाळ येतील राष्ट्रीय कल्चुरी एकता महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डाली मालवीय यांनी केले, सर्व वर्गीय कलार समाजातील महिला साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योजक, महिलांचा तसेच कलार समाजातील विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेत भरभरून यश संपादक केले त्या सर्वांचा सन्मान करण्यात आला. या राष्ट्रीय महिला महा संमेलनासाठी कुरखेडा येतील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. व त्यांच्या या साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल कलार समाजातील एक आदर्श नारीशक्ती म्हणून कलार समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या शुभ प्रसंगी संगीता ठलाल यांनी गोंदिया महिला संघटनेचे आभार मानले. या भव्य अशा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून छबुताई उके, सभापती पं.स.आमगाव, सामाजिक कार्यकर्त्या शितल सोनवाने,रेखाताई पिंपळे अमरावती, वनमाला चौरागडे रामटेक,श्रीती पालेवार वाराशिवनी, आरती चौरागडे देवरी तसेच कलार समाजातील बहुसंख्येने मान्यवर महिला उपस्थित होत्या .या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष शारदा सोनकवरे, सचिव मीना मेश्राम, जिल्हा महिला प्रभारी पूजा डाहाके,,संयोजिका निता धपाडे उपाध्यक्षा रंजू फरकुंडे, ललिला वराडे,रूपाली उके , प्रणिता भोयर, वंदना पिपलेवार, वंदना मानकर, ज्योती देशमुख तसेच संघटनेतील सर्वच महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून भरभरून सहकार्य केले व , हा राष्ट्रीय महिला महा संमेलन यशस्वी रितीने पार पाडला. त्यावेळी सर्व वर्गीय कलार समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

