मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दि 03 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे वार्ड नं. 32 दयाल नगर वर्धा येथे आरोपी किशोर सोनी याचे राहते घरी दारू बाबत प्रो.रेड केला असता, आरोपीचे घरझडतीत व मोपेडचे डिक्की मध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बियर असा जु कीं 2,22,200 रु चा माल मिळून आला.
सदर दारूचा माल हा आ.क्र. 1 किशोर मुरलीधर सोनी याचे मालकिचा असुन, तो चोरट्या पध्दतीने त्याचे राहते घरून व त्याचे मोपेड ने पार्सल पध्दतीने ग्राहकांना अवैधरित्या दारूविक्री करीत असुन, सदर दारूचा माल हा आ.क्र. 2 आकाश उर्फ चक्कन मोटघरे याने त्याचे कारनी आणुन दिल्याचे सांगितले. तरी सदर दोन्ही आरोपी हे त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जप्ती पंचनामा कार्यवाही करून, संपूर्ण मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो उप नि सलाम कुरेशी, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, विनोद कापसे,अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

