मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*_एटापल्ली:-_* गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली जि. गडचिरोली येथे सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे तर या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रृती गुब्बावार ह्या उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे सर यांनी जागतिक महीला दिनानिमित्त विद्यार्थीनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा. डॉ राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. अतुल बारसागडे तसेच महाविद्यालय सेविका श्रीमती सुनिता करमरकर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल ढबाले यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. चीन्ना पुंगाटी यांनी केले व कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .

