प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जागतिक महिला दिनानिमित्त बोरगाव मेघे येथे अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्त्री शक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी सिने अभिनेत्री गिरीजा प्रभू, खासदार अमर काळे, कामगार नेते यशवंत झाडे, अंबिका हिंगमीरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याला महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने चार चांद लागलेत.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक कर्तबगार महिलांचा यावेळी सिने अभिनेत्री गिरीजा प्रभू, खा. अमर काळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अंबिका सोशल फाउंडेशनच्या सहकारी सीमा कोटनाके, कांचन सुखदेवें, दीपिका गोजे आदींच्या विशेष परिश्रमामुळे आजचा सन्मान सोहळा खूप यशस्वी झाला. सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खूप खूप अभिनंदन! आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्व शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

