पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक १ पुणे शहर
दि. २९/०९/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकाकडील पोलीस अंमलदार यांना बातमी मिळाली की, तीन इसम आर. बी. एल. बँक समोर शंकरशेठ रोड पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी येथे सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे अशी बातमी मिळली. सदर ठिकाणी नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले असता इसम नामे १) तालीब शकील अन्सारी, वय २३ वर्षे, रा. घोरपडे वस्ती, कृपा हेरिटेज बिल्डींग, फ्लॅट नं. २०३ लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे. २) आयान अल्ताफ बागवान वय १९ वर्षे, रा. भाग्योदयनगर नविन भट हॉस्पीटलजवळ कोंढवा खुर्द पुणे. ३) वसिम आसिम सय्यद वय १९ वर्षे रा. व्दारा फिरोज भालदार यांचे घर, प्लॅट नं ५०१, फिजा क्लासिक, लेन नंबर १४ भाग्योदयनगर नविन भट हॉस्पीटल जवळ कोंढवा खुर्द पुणे. यांचे ताब्यात एकुण ४.९६,४००/- रु कि चा ऐवज त्यामध्ये अनु. क्र. १ याचे ताब्यात किं.रु.२,३२,६५०/- चा १५ ग्रॅम ५१० मिलीग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ अनु.क्र.२ याचे ताब्यात किं.रु. ७६,५००/- चा ०५ ग्रॅम १०० मिलीग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ, अनु.क्र.३ यांचे ताब्यात किं. रु.1७७,२५०/- चा ०५ ग्रॅम १५० मिलीग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ असा एकुण ३८६,४००/- रु किं चा. २५ ग्रॅम ७६० मिलीग्रॅम एम. डी हा अंमली पदार्थ तसेच अॅक्सेस गाडी किं. रु.५०,०००/- रु चा कि.६०,०००/ रु ३ मोबाईल फोन, असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने सदरचा एम.डी हा अंमली पदार्थ पंचनाम्याने जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९४ /२०२२, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क) र (४) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हें श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्बे यांचे मार्गदर्शना खाली अमली पदार्थ विरोधी पथक, प गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण गळे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

