🖋️मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
याप्रकरणी वडाळा शिवारातील न्यू गरीब नवाज कॉलनीतील युवकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित इम्रान इनामदार रा. साईनाथनगर, वडाळारोड, दोन पुरुष व तीन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित इम्रान इनामदार याच्यासह इतर दोन पुरुष व तीन महिलांनी युवकास १४ सप्टेंबरला जुनी कार दाखवण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नेले. प्रवासात पाण्यात गुंगीचे औषध टाकून त्यास पाणी पाजले. त्यामुळे युवकास गुंगी आली. संशयितांनी युवकास अर्धनग्न करीत मुलीसोबत त्याचे फोटो व व्हिडीओ काढले. हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयितांनी युवकाकडून रोख, ऑनलाइन पद्धतीने ९५ हजार रुपये काढून घेतले. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने युवकाने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इदिरानगर पोलीस करत आहेत.

