पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी..
युनिट २. गुन्हे शाखा पुणे शहर
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास अटक, गुन्हयात (H) शेडयुल्ड मध्ये मोडणारी १,७०,४०५/- रुपये किंमतीचे इंजेक्शन (औषधे) जप्त. पुणे शहरात मोठया प्रमाणावर मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन ( औषधे) बाजारात विना परवाना चोरुन विक्री करण्याच्या प्रकारच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी युनिट-२ कडील प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली टिम तयार करून युनिट-२ हद्दीत पेट्रोलींग करत असताना.
मिळालेल्या बातमी प्रमाणे एक इसम विनापरवाना अधिक किंमतीचे औषधांची विक्री करीत असून सदर इसम हा औषधांची विक्री करण्याकरीता पौर्णिमा टॉवर, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे या ठिकाणी MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP (Phantermine ) या SCHEDULE || DRUG या औषधाच्या या वेगवेगळ्या पेटेन्ट हे सदर व्यक्ती औषधे विक्री परवाना नसताना त्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना विनापरवाना बॉडी बिल्डींगसाठी गैरवापर करण्याचे उददेशाने तसेच सदर इंजेक्शनचा औषध म्हणून वापर होत नसुन केमिकल म्हणुन अवैध्य पदधतीने सुदृढ प्रकृती दिसण्यासाठी, त्याचा गैरवापर होत असल्याने सदर बेकायदेशिररित्या खरेदीकरुन साठवणुक व विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने बातमीचे ठिकाणी सापळा रचून प्राप्त बातमीतील इसमास तान्यात घेतले त्याचे नाव अमृत पंडीत चौधरी वय ३० राप्रोटेक्ट कंप्युटर शेजारी केशवनगर मुंळवा पुणे असे असून त्याचे अंगझडतीत १,७०,४०५ रु. किंमतीचे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP (Phantermine) SCHEDULR DRUG हे मिळून आले आहे.
त्याबाबत अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयात औषध निरीक्षक, झोन १ चे अधिकारी सौ शामल किरण महिन्द्रकर मॅडम यांचे तक्रारीवरुन त्याचे विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २५१ / २०२२ भा.द.वि. कलम २७६,३३६.३२८, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि विशाल मोहिते गुन्हे शाखा युनिट २ हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक,मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर, सपोनि विशाल मोहिते, पोलीस अमलदार रेणुसे, मोकाशी, पवार, नेवसे, राजपुरे, ताम्हाणे, शेख, जावद, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.

