नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*मीआम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्रीमती नीतू जोशी यांच्या सामाजिक कार्याचे नागरिकांनी केले कौतुक*
1.6 MTPA बेनिफिशिएशन प्लांट, 1.2 MTPA पेलेट प्लांट आणि 8×350 TPD चा स्पंज आयर्न प्लांट, सोबत इंडक्शन फर्नेस 0.75 MTPA आणि 0.75 MTPA चा रोलिंग मिल आणि 120 MW चा कॅप्टिव्ह पॉवर प्लांटची निर्मिती वडलापेठ ता. अहेरी येथे होत आहे.आज गडचिरोली येथील नियोजन भवन येथे सदर प्रकल्पाबाबत जन सुनावणी घेण्यात आली.
सदर जनसुनावनीत अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी मत व्यक्त करत गडचिरोली जिल्हा औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.सदर जनसुनावणीला वडलापेठ परिसरातील दहा ते बारा गावातील नागरिकांनी सहभाग दर्शवला होता. सुरजागड इस्पात कंपनी सुरू व्हायच्या आधीच सदर कंपनीने अनेक लोकांना रोजगारासाठी पुढाकार घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे या भागात मीआम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्रीमती नीतू जोशी यांच्या सामाजिक कार्याचे नागरिकांनी कौतुक केले .सदर कंपनी परिसरात आल्यामुळे नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल त्यामुळे या कंपनीला आपला कोणताही विरोध नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे सदर जन सुनावणीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम माजी आमदार दीपक दादा आत्राम, माजी आमदार देवराव होळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, सुरजागड इस्पात कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, माझी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन राव बाबा आत्राम, वडला पेठ गाव परिसरातील शेकडो नागरिक सदर जनसुनावणीला प्रामुख्याने उपस्थित होते.

