हिंगणघाट येथे पार पडला शंकर पटाचा बक्षीस वितरण सोहळा.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पट शौकीन स्वर्गीय कृष्णरावजी झोटिंग पाटील व वृषभ सेठ सुराणा, मुन्नूभाईजी कोचर, बैलड्रायव्हर मारोतराव राऊत, स्व.धनराज कलोडे, स्व.वसंत पाटील पोंगडे यांचे स्मृती प्रित्यर्थ हिंगणघाट येथे शेतकरी शंकर पट व नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी यांच्या वतीने दिनांक २१ ते २४ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असता शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
सदर शंकर पट व नाट्य महोत्सवाचे आयोजन शहरानजीकच्या नांदगाव ता.हिंगणघाट येथे करण्यात आले होते. याच दरम्यान आयोजीत नाट्यमहोत्सवा अंतर्गत जिवन पटावर आयोजित युवा रंगमंच वडसा प्रस्तुत “भूक” या सुप्रसिद्ध नाटकाचे आयोजन दि.२२ मार्च तर दि.२३ मार्च रोजी रंगतरंग थिएटर्स वडसा प्रस्तुत “नशीब” या नाटकाचे आयोजन करण्यात आले असता मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी नाट्याचा आस्वाद घेतला. या शंकपटात विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैलजोड्या नी भाग घेतला आणि रोख रकमेच्या बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लयलूट केल्या गेली.
दिनांक २४ मार्च २०२५ ला बैलजोडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये जनरल गट “अ” मधील प्रथम क्रमांकाचे पुरस्कार ५१ हजार स्वर्गीय मुन्नूभाईजी कोचर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंकज श्रीचंद कोचर यांच्याकडून गणेश कावलकर राहणार वाडोणा यांचा बैल लाडक्या व लकी, द्वितीय पुरस्कार ३१ हजार स्वर्गीय यादवराव गोल्हार यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲड.राजू गोल्हर, स्व रामभाऊजी अवचट स्व. वसंतराव तडस यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ प्रा.राजू/अजय अवचट यांच्याकडून अभिजीत राठोड, तृतीय पुरस्कार २५ हजार स्व. बाबासाहेब घोरपडे स्मृतीप्रीत्यर्थ डॉ अतुल घोरपडे यांच्याकडून कैलास निकम, चतुर्थ पुरस्कार २० हजार स्व. रमेश जी चंदनखेडे स्मृती प्रित्यर्थ/दिनेश अमोल चंदनखेडे त्यांच्याकडून सुभाषराव आठे, पाचवा पुरस्कार १५ हजार स्व. अरविंदराव चंदनखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अशोक चंदनखेडे यांच्याकडून साक्षी भोंगे, सहावा पुरस्कार १२ हजार स्व यादवराव घाटे स्मृती प्रित्यर्थ दिवाकर गाठे यांच्याकडून जोगेंद्र राऊत, सातवा पुरस्कार ११ हजार स्व सत्यशील रेवतकर स्मृति प्रित्यर्थ संदीप रेवतकर यांच्याकडून बंडू पाटील डफडे, आठवा पुरस्कार १० हजार स्व भाऊरावजी पाटील येरलेकर स्मृती प्रित्यर्थ प्रा.येरलेकर यांच्याकडून हेमंत फरकाडे, नववा पुरस्कार ०९ हजार स्व.भाऊरावजी सायंकार यांचे स्मृति प्रित्यर्थ सुरेश सायंकार यांच्याकडून लखन जाधव, दहावा पुरस्कार ०८ हजार स्व. रामाजी मुंजेवार स्मृती प्रित्यर्थ सुरेश मुंजेवार यांच्याकडून नाना गोसावी, अकरावा पुरस्कार ०७ हजार स्व माणिकराव कुकसे स्मुर्ती प्रित्यर्थ जितेंद्र कुकसे यांच्याकडून इशिता लोंढे, बारावा पुरस्कार ०६ हजार स्व. स्वर्णसिंग जुनी स्मुर्ती प्रित्यर्थ गुरुदयालसिंग जुनी यांच्याकडून डॉ.आशिष सालंकर, तेरावा पुरस्कार ०५ हजार स्व. पुखराजजी कोठारी स्मुर्ती प्रित्यर्थ अभय कोठारी यांच्याकडून रमेशराव पाटील, चौदावा पुरस्कार ०४ हजार स्व. सागरजी कासवा स्मृति प्रित्यर्थ संजय कासवा यांच्याकडून रमेशराव पाटील, पंधरावा पुरस्कार ०३ हजार स्व. कृष्णाजी ढोमणे स्मृती प्रित्यर्थ सतीश ढोमणे यांच्याकडून राजू भोयर ला देण्यात आले.
तसेच ब गटातील प्रथम पुरस्कार २५ हजार स्व.ऋषभ शेठ सुराणा स्मृती प्रित्यर्थ प्रवीण सुराणा यांच्याकडून निलेश काळमेद, द्वितीय पुरस्कार १५ हजार स्व. मारुतराव राऊत स्मृतिप्रीत्यर्थ महेश/सतीश राऊत यांच्याकडून लकी पांडे, तृतीय पुरस्कार ११ हजार देवराव पाटील साबळे व अनंता साबळे यांच्याकडून यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ, चतुर्थ पुरस्कार १० हजार स्व. ताणबाजी डंभारे स्मृतिप्रीत्यर्थ मधुकर डंभारे यांच्याकडून श्यामभाऊ राऊत, पाचवा पुरस्कार ०९ हजार स्व. सुधाकरराव वडतकर स्मृती प्रित्यर्थ हरीश वडतकर यांच्याकडून साहेबराव पाटील, सहावा पुरस्कार ०८ हजार स्व. रमेशराव मंगेकर स्मृतीप्रीत्यर्थ राजू मंगेकर यांच्याकडून मनीष डफडे, सातवा पुरस्कार ०७ हजार विजयसिंह छोयले स्मुर्ती प्रित्यर्थ हनुमानजी छोयले यांच्याकडून साहेबराव पाटील, आठवा पुरस्कार ०६ हजार स्व. दादाजी भोरे स्मृती प्रित्यर्थ राजू भुरे यांच्याकडून प्रशांत बकाळ, नववा पुरस्कार ०५ हजार स्व. वामनरावजी लोंढे स्मूर्ती प्रित्यर्थ रमेश लोंढे यांच्याकडून शाम भाऊ राऊत, दहावा पुरस्कार स्व. पांडुरंग बादले स्मूर्ती प्रित्यर्थ महादेव (पिंटू) बादले यांच्याकडून अभिजीत पांडे, अकरावा पुरस्कार ०३ हजार सचिन वासुदेवराव तुळणकर यांच्याकडून, बारावा पुरस्कार ०२ हजार स्व.मधुकरराव साळवे स्मृती प्रित्यर्थ अनिल साळवे यांच्याकडून, तेरावा पुरस्कार १५०० स्व.मारोतराव कापकर स्मृती प्रित्यर्थ प्रदीप कापरे यांच्याकडून, चौदावा पुरस्कार ११०० संदीप डगवार यांच्याकडून, पंधरावा पुरस्कार १ हजार उमेश उंमरे यांच्याकडून देण्यात आले.
वर्धा जिल्हा गटातील प्रथम पुरस्कार ०७ हजार स्व. मधुकरराव साळवे स्मृती प्रित्यर्थ सुधीर साळवे यांच्याकडून बंडू पाटील, द्वितीय पुरस्कार ०५ हजार स्व. बळी रावजी लोहकरे स्मृती प्रित्यर्थ राहुल लोहकरे यांच्याकडून बंडू पाटील, तृतीय पुरस्कार ०४ हजार स्व.भदोजी उंमरे स्मुर्ती प्रित्यर्थ राजू उंमरे यांच्याकडून उमेश चरडे, चतुर्थ पुरस्कार ०३ हजार स्व.देवरावजी तडस स्मुर्ती प्रीत्यर्थ तेजस तडस यांच्याकडून अंश कोरडे, पाचवा पुरस्कार ०२ हजार स्व. नथुजी राऊत स्मृती प्रित्यर्थ अमोल राऊत यांच्याकडून दत्तात्रय खेडेकर, सहावा पुरस्कार १५०० स्व हरिदासजी कीटे स्मृती प्रित्यर्थ पांडुरंगजी कीटे यांच्याकडून अंश कोरडे, सातवा पुरस्कार ०१ हजार स्व शामरावजी ढेकाटे स्मुर्ती प्रित्यर्थ बंडू डेकाटे यांच्याकडून देण्यात आले आहे.
हिंगणघाट तालुका गट प्रथम पुरस्कार ०५ हजार स्व. शामरावजी डगवार स्मुर्ती प्रित्यर्थ प्रदीप डगवार यांच्याकडून प्रदीप कोरडे, द्वितीय पुरस्कार ०४ हजार स्व. देविदासजी इखार स्मृती प्रित्यर्थ संजय इखार यांच्याकडून सागर तिमांडे, तृतीय पुरस्कार ०३ हजार स्व. कवरलालजी गांधी स्मृती प्रित्यर्थ मनीष गांधी यांच्याकडून नैतिक सुपारे अल्लीपूर, चतुर्थ पुरस्कार २००० रू स्व. विठ्ठलरावजी कडू स्मृतिप्रित्यर्थ अनिल कडू यांच्याकडून प्रेमचंद राडे, पाचवा पुरस्कार १५०० स्व. दामोदरराव धवणे स्मृती प्रित्यर्थ हरिभाऊ धवणे यांच्याकडून समीर इंगोले चनाटाकळी, सहावा पुरस्कार ११०० स्व. संजय ढोकपांडे स्मृती प्रित्यर्थ प्रमोद फूसे यांच्याकडून शुभम हरगुडे फुकटा, सातवा पुरस्कार ०१ हजार स्व. केशवराव गोहने स्मृती प्रित्यर्थ पुरुषोत्तम गोहणे यांच्याकडून देण्यात आले आहे.
या बक्षीस वितरण सोहळ्याला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, उद्योजक प्रसन्ना बैध, बाजार समितीचे उपसभापती हरीश वाडतकर, मधुकरराव डंभारे, उत्तम भोयर पिंटू बादले, दिगंबर चांभारे, पंकज कोचर, आफताब खान, हरिभाऊ धवणे, अनिल दौलतकर, राजू भोरे, निशान बोरकुटे, तेजस तडस,अमित कोठारी, दीपक माडे, संजय तुराळे इत्यादींच्या हस्ते बैल जोडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौरभ तिमांडे, गौरव तिमांडे, बबलू कोल्हे, सागर तिमांडे, अविनाश खटी, जयदेव दारुंडे, अक्षय भगत, अक्षय लोखंडे, मधुकर कुटे, निशांत ठवरी, मंगेश महाकाळकर, अभी लोखंडे, दामाजी कुकडे, चेतन, महेश राऊत, सतीश राऊत, फैजान सय्यद, हर्षल तपासे, ओम सावरकर, यश खेनवार इत्यादीनी परिश्रम घेतले. पट पाहण्या करिता परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

