माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत मदनागिरी देवी बोनालू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो.नं. 9420 751809
*आलापल्ली:आलापल्ली येथील वार्ड न 3 येथे मदनागिरी देवी चे मंदिर असून या देवीचा बोनालु दर तीन वर्षांनी होत असतो,हा बोनालू उत्सव दोन दिवसीय असून या उत्सवात देवी देवतांचे गंगास्नान करून विधीवत पूजा करून देवीची स्थापना करण्यात आले.व या बोनालु उत्सवानिमित्त दोन जोडप्यांचे विवाह सोहळा पार पडला.*
*या मदनागिरी देवी बोनालू कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते विधीवत पूजा करून नवं विवाहित जोडप्यांना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून भेट वस्तू देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले,त्यानंतर आलापल्ली येथील आदिवासी समाज बांधवांनी बोनालू चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.*
*या मदनागिरी बोनालू कार्यक्रमाला आलापल्ली येथील समाजाचे पुजारी सुनीता आत्राम,शांताबाई आत्राम तसेच आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती ईश्वरजी वेलादी,मीराबाई सडमेक,सुमन सिडाम,ताराबाई तोरेम,ग्राम पंचायत सदस्या माया कोरेत,संगीता कोरेत,उमेश आत्राम,स्वामी वेलादी,तिरुपती वेलादी,रुपेश आत्राम,सूरज मडावी,सूरज मेश्राम,उमेश आलाम, राकेश आलाम,अविनाश मेश्राम,संदीप मेश्राम,सुरेश मडावी,सुमित वेलादी,बाबुराव मडावी,श्रीनिवास कंनाके, नागेश वेलादी,संजय आक्केवार, माजी सरपंच विजय कुसनाके सह आलापल्ली गावातील आदिवासी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.*

