मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक समशेर खान पठाण यांना पुरस्कार गौरवण्यात आले.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.
दिनांक 27/ 3/ 2025 रोजी जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये सत्र 2024 -25 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित भगवंतराव हायस्कूल बोटेकसा तालुका कोरची यांना प्रथम क्रमांक अकरा लाखाचे बक्षीस पटकाविल्याबद्दल जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य कार्यपालन अधिकारी माननीय श्री सुहास गाडे साहेब यांच्या हस्ते माननीय शमशेर खान पठाण मुख्याध्यापक यांना गौरविण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री माननीय वासुदेव भुसे साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच श्री पुनीत मातकर साहेब अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तसेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी माननीय भुयार साहेब प्रामुख्याने उपस्थित होते तसेच श्री बाबासाहेब पवार शिक्षणाधिकारी प्राथमिक व विवेक नाकाडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले वरील सर्व कार्यक्रमात जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय यांना सुद्धा गौरविण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभले वरील कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष माननीय श्री बबलू भैया हकीम यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संपूर्ण कार्यक्रमात वनवैभव शिक्षण मंडळाचे पदाधिकारी सौ.लीना पठाण सदस्यां तसेच अब्दुल जहीर अब्दुल हकीम कोषाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी सर्व शिक्षक कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

