पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर
रा. ब्लॉक नं.२३ हरिहरेश्वर सोसायटी समोर वडारवाडी पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर ०७
साथीदार यांचेवर चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
यातील आरोपी नामे ५) अजय चंद्रकांत विटकर वय २० वर्षे रा. ब्लॉक नं.२३ हरिहरेश्वर सोसायटी समोर वडारवाडी पुणे हा (टोळी प्रमुख) असुन, त्याने त्याचे इतर साथीदार २) विजय चंद्रकांत विटकर वय १८ वर्षे रा. ब्लॉक नं.२३ हरिहरेश्वर सोसायटी समोर वडारवाडी पुणे ३) दत्ता रविंद्र धोत्रे वय २२ वर्षे रा. ३९१वडार हौसिंग सोसायटी वडारवाडी पुणे ४) सागर मनोहर धोत्रे वय २७ वर्षे रा.८८३ जय मित्र मंडळा जवळ वडारवाडी पुणे ५) सिध्दार्थ शंकर गायकवाड वय २३ वर्षे रा. ९४३ सी-१ पी.एम.टी. सोसायटी हनुमान नगर वडारवाडी पुणे ६) कृष्णा ऊर्फ किच्ची राजेश माने वय २५ वर्षे रा. कालीकामाता मंदीरा जवळ वैदुवाडी सेनापती बापट रोड पुणे ७) अतुल धोत्रे वय २२ वर्षे ( पाहिजे आरोपी) ८) विजय ऊर्फ चपाती विटकर, वय २३ वर्षे ( पाहिजे आरोपी) यांचेसह स्वतःचे तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे व अवैद्य मार्गाने इतर फायदा व्हावा म्हणुन स्वतः व टोळीतील सदस्यांना वेळोवेळी बदलुन विथावणी देऊन, हिंसाचाराचा वापर करून मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे सार्वजनिक उपद्रव करणे नागरीकांचे वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे घातक हत्यारे विनापरवाना जवळ बाळगणे बेकायदेशिर जमाव जमवुन त्यात हत्यारासह सागील होवुन दंगा करून दहशत निर्माण करणे अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच्या टोळीच्या अश्या कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखिल त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
सदर आरोपी यांचेविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५५/२०२२, भादवि क.३०७, ४५२. ४२७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह १३५. फौजदारी (सुधारण) कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे टोळीचे फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) चा अंतर्भाव होण्यासाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे यांनी श्री रोहीदास पवार पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर यांचे मार्फतीने श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे यांना सादर केला होता.
त्यांनी नमुद गुन्हयांचे अवलोकन व अभ्यास करुन टोली प्रमुख अजय चंद्रकांत बिटकर वय २० वर्षे रा. ब्लॉक नं. २३ हरिहरेश्वर सोसायटी समोर वडारवाडी पुणे व त्याचे इतर ७७ साथीदार यांचे विरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५५/२०२२ भादविक. ३०७, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महा. पो. का. क. ३७ (१) (३) सह१३५, फौजदारी (सुधारण) कायदा कलम ७ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची परवानगी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती आरती बनसोडे सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे हे करीत
आहेत सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, गा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण मा. पोलीस उप आयुक्त, परि ४, पुणे शहर, श्री. रोहिदास पवार.गा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री राजकुमार चापचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे व श्री. अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पो निरीक्षक, राजकुमार केंद्रे यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उप निरीक्षक, निलेश महाडिक पोलीस अंमलदार, अमित छड़ीदार, अमित गद्रे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३५ वी व एकुण ९८ वी कारवाई आहे.