Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून खाण सुपरवायजरने केली स्वतःला पेटवून घेत आत्महत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 10, 2025
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून खाण सुपरवायजरने केली स्वतःला पेटवून घेत आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/ तुमसर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कंपनीच्या मालकीची दुचाकी परत करून येतो, असे पत्नीला सांगून गेलेल्या खाण मध्ये सुपरवाझर असलेल्या एका इसमाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ माजली आहे. आंधळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरगाव येथील पार्श मिनरल्स खदान परिसरात घडली. जावेद जमील शेख वय 49, ह.मू. तिलक वॉर्ड मोहाडी/मूळचे रा. चंद्रपूर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

खाण सुपरवायजरने आत्महत्या केल्याची ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास उघडकीस येताच आंधळगाव पोलिसांसह स्थानिकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. पोलादी कंटेनरमध्ये थाटलेल्या कार्यालयात घडलेली ही घटना सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा कयास होता.

जावेद जमील शेख या खाण सुपरवायजरने नागपूर येथून जाऊन खाण कंपनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे रेकॉर्डिंग थेट फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले. मृतक जावेदचे रेकॉर्डिंग पुढे येताच घटनेने गंभीर वळण घेतले. पतीला वारंवार कॉल करूनही फोन बंद येत असल्याने फिर्यादी पत्नी नाजिया जावेद शेख 40, रा. मोहाडी हिने परिचितांना संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली. कंटेनर आतून बंद करून घेत पेटवून घेतल्याने जावेद 90 टक्के जळाला. त्याची ओळख देखील पटणार नाही, अशा स्थितीत पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.

आरोपी कंपनी मालकांची टोळी भूमिगत: मृताच्या रेकॉर्डिंगबाबत कळताच आरोपी भूमिगत झाले आहेत. सध्या पोलिसांना ते सापडत नाही. मात्र, तुमसर शासकीय रुग्णालयात आरोपींकडून मध्यस्थी साधण्याच्या हेतूने काही पसार इसमांनी पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने सांगितले.

मानसिक त्रास देणे, सर्वांसमक्ष प्रताडीत करणे, असा प्रकार सुरू होता. 2031 पर्यंत कंपनीचे काम चालले, या आधारावर करार करण्यात आला होता. दरम्यान, बंद पडलेल्या कंपनीत अवेळी कर्तव्य बजावण्यासाठी दबाव टाकत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

पोलिसांच्या चौकशीवर नजरा: जिल्हा न्यायालयाने अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात मोहाडी पोलिसांना चौकशीच्या संदर्भात चांगलेच फटकरल्याचा रेकॉर्ड असलेल्या पोलिसांकडून जावेदच्या प्रकरणांत सगळे बारकावे हाताळून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यात सदर चौकशीवर उपनगरातील विशिष्ट समुदायाच्या शिष्टमंडळाच्या नजरा लागून आहेत.

पत्नीने मागितला न्याय: 2 मे पासून मृत व त्याचे कुटुंब नागपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. जावेद शेख नागपूर येथून कंपनीच्या दुचाकीने कर्तव्याच्या ठिकाणी नियमित हजर राहत होता. घटनेच्या दिवशी देखील तो नागपूरहून कंपनीत पोहोचला होता. आरोपी वीरेंद्र त्याला वारंवार फोनवरून धमकावत होता. तसा उल्लेख फिर्यादी नाजियाने आपल्या तक्रारीत केला आहे. नाजियाने आपल्या पतीची आत्महत्या नसून कंपनीने त्यांचा जीव घेतल्याची भावना व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Tags: Tumsarकंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून खाण सुपरवायजरने केली स्वतःला पेटवून घेत आत्महत्या.
Previous Post

रेल्वे अंदर ब्रिज विसापुर में साफ सफाई व्यवस्था के लिए भाजपा कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष सौरभ गिरसावडे के नृतुत्व में वीसापुर ग्राम पंचायत को दिया निवेदन.

Next Post

वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

वायगाव हळदीला लवकरच चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल: पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In