विश्वानाथ जांभूळकर एटापल्ली तालूका प्रतिनिधी. मो. नं. 9421856931
एटापल्ली
६ मे ला नॅशनल सेंटर फाॅर रुरल डेव्हलपमेंट संस्था नागपुर द्वारा संचालीत विनोबा प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा कोठमी तर्फे आलापल्ली येथील कन्यका मंदिर सभागृहात आयोजित स्नेहमिलन सोहळा व उत्कृष्ठ कर्मचारी सम्मान सोहळा, मोठ्या थाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी या संस्थेचे सचिव अब्दुल जमिर अब्दुल हकीम होते. उदघाटक शाहीन अब्दुल हकीम या होत्या, प्रमुख अतिथी एन.सी.आर.डी.नागपुर संस्थेचे कार्यकारी संचालक शेखर टोंगो, तथा समन्वय अधिकारी सिध्देराम हे होते.
या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, प्राथमीक शिक्षक, कामाठी, स्वंयपाकी, मदतनिस, उत्कृष्ट माध्यमिक मुख्याध्यापक यांना या सत्रातील उत्कुष्ठ कामगीरी बद्दल पुरस्कार देवून या स्मृतिचिन्छ, भेटवस्तू, शाल-श्रीफलाने सन्मान करण्यात आला.
या संस्थेचे एटापल्ली तालुक्यात पद्देवाही,हेडरी,गेदा,कोठमी,अहेरी तालुक्यात तलवाडा, तसेच भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे विनोबा प्राथ व माध्य शाळा आहे. संस्थेकडुन दर वर्षी उत्चृष्ठ कामगीरी बद्दल पुरस्कार देण्यात येते. यावर्षी
उत्कृष्ट शाळा शिक्षण विभाग चा हेडरी व उत्कृष्ट शाळा प्रशासक गेदा यां शाळाना प्रथम पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले
या शाळेला
संस्थेकडून झेराॅक्स मशिन व डिजीटल बोर्ड देण्यात आले.
संस्थेचे संचालक शेखर टोंगो यांची श्री. जी. एम. माहूरकर सर विनोबा आश्रम शाळा कोटी यांनी ” प्रश्न आमचे, उत्तरे तुमची यावर प्रकट मुलाखत घेतली कार्यक्रमाचे संचालन जी.एम.माटूरकर,यांनी केले आभार पी.एस.राहाटे यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
जिवन गौरव पुरस्कार
प्राथमीक शिक्षक एस. एम. चांदेकर, तथा आर. डी. बेलखोडे, प्राथमीक मुख्याधापक
ए. एन. पिपरे, जि. बी. कोरेतार, (स्वयंपाकी सेवा निवृत्त)
उत्कृष्ट माध्यमिक शिक्षिका
सौ. जे. जी. गादेवार ( उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक)
एच. एन. पाटील ( शिक्षक )
उत्कृष्ट पुरुष अधिक्षक,
श्री एल. एम. मोहुर्ले
उत्कृष्ट स्त्री अधिक्षिका,
कु. के. एस. खोब्रागडे यांना देण्यात आले.
उत्कृष्ट प्रोत्साहन
ए. ए. निमरड (पुरूष अधिक्षक)
कु. एल. आर. वड्डे (स्त्री अधिक्षिका)
उत्कृष्ट चतुर्थश्रेणी कर्मचारी
श्री एस. पी. गुरूडवार (स्वयंपाकी)
बी. एन. मुंजमकर (कामाठी)
उत्कृष्ट चतुर्थश्रेणी कर्मचारी
श्री वाय. यु गुजरकर (मदतनिस)
उत्कृष्ट माध्यमिक मुख्याध्यापक
श्री एच. जे. ताजणे
विशिष्ट सेवा गौरव पुरस्कार
श्री एम. एन. शेख, (स्वयंपाकी सेवा निवृत्त)
विशिष्ट सेवा गौरव पुरस्कार
श्री ए. व्ही. हमंद, (हमंद भाजीपाला सेंटर एटापल्ली)
कार्यक्रमाचे आयोजक कोठमी शाळेचे मुख्याधापक संदिप पेंपकवार व कर्मचार्यांना पुरस्कार देवुन सम्मान करण्यात आले.
अब्दुल जमीर अब्दुल हकीम, सचिव वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी (3) श्रीनिवास गणमुकुलवार अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवता परिषद अहेरी यांचा विशेष पुरष्कार देवुन सन्मान करण्यात आले.

